Bajrang Sonawane on Laxman Hake :  लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची असेल म्हणून ते सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त आहेत, अशी मिश्किल टीका बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी निरक्षर खासदार म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आज पत्रकारांनी याबाबत सोनवणे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हाकेंचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसापांसून लक्ष्मण हाके हे राज्याच्या विविध भागात दौरे करत आहेत. यावेळी त्यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज त्यांच्या या टीकेला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Continues below advertisement

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्त कुटुंबाला 50 हजारांची मदत द्या

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शाब्दिक वारांचा जोर वाढताना दिसतो आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके यांच्यावर मिश्किल टीका केली. लक्ष्मण हाके बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त फिरत आहेत, कारण त्यांना बीडमधून आगामी निवडणुका लढवायच्या आहेत. अशा शब्दांत सोनवणे यांनी हाके यांचा समाचार घेतला. दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त कुटुंबाला 50 हजारांची मदत जाहीर करावी. अशी मागणी देखील खासदार सोनवणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Vijaysinh Pandit meet Manoj Jarange Patil : हाकेंसोबत जोरदार राडा झाल्यानंतर विजयसिंह पंडित जरांगेंच्या भेटीला आझाद मैदानावर पोहोचले; म्हणाले, अजून वातावरण...