बीड : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Certificate) देण्यासाठी शासन स्तरावर कुणबी नोंदींची तपासणी केली जात आहे. मराठवाड्यापासून (Marathwada) याची सुरुवात झाली आणि आता राज्यभरात प्रशासनाकडून कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. दरम्यान, मराठवाड्यात एकूण 8 कोटी 99 लाख 33 हजार 281 दस्तऐवज तपासल्यावर 29 लाख 1 हजार 121 मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक नोंदी बीड (Beed) जिल्ह्यात सापडल्या आहेत. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 22 लाख दस्तावेज तपासण्यात आले असून, ज्यात एकूण 11 हजार 127 मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी शासन स्तरावर मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रशासनाने यासाठी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 11 हजार 127 मराठा कुणबी नोंदी बीड जिल्ह्यात आढळल्या आहेत. तर, दुसरीकडे प्रशासनाच्या माध्यमातून या कुणबी प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात येत आहे. तर, बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, तर दुसरीकडे परळीमध्ये मात्र आतापर्यंत एकही कुणबी नोंद आढळून आलेली नाही. बीड जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी तपासण्यासाठी आतापर्यंत 22 लाख दस्ताऐवज तपासण्यात आले आहेत. ज्यात, उर्दू व मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी भाषांतर करांचीही मदत घेतली जात आहे.


राज्यात 29 लाख नोंदी सापडल्या...


राज्यात गेल्या 15 दिवसांत 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत सापडेल्या नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक नोंदी मिळाल्या आहेत. तर, ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली, त्याच मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून 8 कोटी 99 लाख 33 हजार 281 नोंदींपैकी कुणबी- मराठा जातीच्या 29 लाख एक हजार 121नोंदी सापडल्या आहेत. सर्वात जास्त कुणबी नोंदी या विदर्भामध्ये सापडल्या आहेत. विदर्भात आतापर्यंत 13 लाख 3 हजार 885 नोंदी सापडल्या आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी कुणबी नोंदी या कोकणात सापडल्या आहेत. कोकणात जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर सर्वात कमी 118 कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी नव्याच आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलीत करण्याचे काम सुरू असून, या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : आतापर्यंतच्या सर्व समित्यांच्या शिफारशी तपासणार, त्रुटींचा अभ्यास होणार, मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची कार्यपद्धती ठरली