Maratha Meeting on Loksabha Election : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्यांवरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लोकसभेसाठी प्रत्येक गावातून 2 अर्ज, 5000 उमेदवार देणार आहेत. शिवाय मोदी -शाहविरुद्धही फॉर्म भरले जाणार आहेत. बीडमध्ये मराठा समाजाची बैठक (Maratha Meeting) पार पडली. या बैठकीत (Maratha Meeting) हे निर्णय घेण्यात आले आहेत. 


निवडणुकीमध्ये मराठा समाज सरकारला घेरणार 


लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील देखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजचं सरकारला घेरणार आहे. तर या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठराव घेण्यात आले असून जोपर्यंत सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एकमताने ठरवण्यात आल आहे.


बीडपाठोपाठ नगरमध्येही बैठक (Maratha Meeting)


मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगर येथील मराठा समाजाच्या (Maratha Meeting) वतीने जिल्हास्तरीय बैठक पार पडली. अहमदनगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्वाचे ठराव घेण्यात आले.ज्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर  लोकसभा निवडणुकीत प्रत्येक  मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 


प्रत्येक मराठा बांधव आमची देखील चौकशी करा, अशी मागणी करणार


शिवाय, येऊ घातलेल्या निवडणूकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठींबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही. प्रचार सभेत सहभागी होणार नाही, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाही अशी शपथ घेण्यात आलीये. सोबतच जरांगे पाटील यांना ईडी लावता येत नसल्याने त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत केली जाणार आहे. या एसआयटीला प्रत्येक मराठा बांधव आमची देखील चौकशी करा, अशी मागणी करणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Election 2024 : अवघ्या काही तासांमध्येच भाजपच्या दोन खासदारांचा राजकारणालाच रामराम! नेमकं घडलं तरी काय?