पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गाठीभेटी, दौरे, यांना वेग आला आहे. अशातच लोकसभेपासून (Loksabha Election) नाराजी असलेल्या काही नेत्यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी चर्चा, भेटीगाठी सुरू केल्या आहेत, असं असतानाच लोकसभेला शिरुरमधून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. लांडे (Vilas Lande) यांनी पुण्यातील (Pune News) मोदीबागेत शरद पवार (Sharad Pawar) यांची मंगळवारी (१० सप्टेंबर) भेट घेतल्याने लांडे (Vilas Lande)हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भोसरी दौऱ्यावेळी लांडेंची (Vilas Lande)अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
भोसरीतील माजी आमदार विलास लांडेंनी (Vilas Lande) अजित पवारांच्या (Ajit Pawar) आजच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. विलास लांडे (Vilas Lande) सध्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) संपर्कात आहेत. ते तुतारी फुंकतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच लांडेंनी (Vilas Lande) अजित दादांच्या (Ajit Pawar) दौऱ्यात पाठ फिरवली, ही गैरहजेरी म्हणजे विलास लांडेच्या (Vilas Lande) शरद पवार गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब करणारी आहे, अशी चर्चा रंगलेली आहे. आता आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी दिले होते.
आगामी काळात विलास लांडे आपलाच प्रचार करतील : गव्हाणे
आगामी काळात विलास लांडे(Vilas Lande) हे आपलाच प्रचार करतील असा विश्वास अजित गव्हाणेंनी काही दिवसांपुर्वी व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अजित गव्हाणेंचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) हे मार्गदर्शक समजले जातात.
हवेली विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार लांडे यांना सलग दोन वेळा भोसरीतून पराभव पचवावा लागला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांना पराभूत केले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विलास लांडे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.