Nagar-Beed Railway Line : गेल्या 40 वर्षांपासून चर्चेत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या शुभारंभाचा मुहूर्त ठरला असून, 23 सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आष्टीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यापूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन कुमार हे येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला असून, आता मुख्यमंत्री-उपमुखांच्यासोबतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आष्टी मध्ये 23 तारखेला सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
बहुप्रतीक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाववरील रेल्वे प्रत्यक्षात बीडकरांच्या सेवत धावण्यासाठी तयार झाली आहे. नगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून नगरहून सोलापूर वाडी आणि तिथून आष्टीपर्यंत रेल्वे धावणार आहे. यापूर्वीचा आष्टी ते नगर या रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी झाली आहे. त्यामुळे ही रेल्वे नागरिकांच्या सवेत कधी सुरु होणार याकडे बीडकरांचे लक्ष लागले होते. मात्र बीडवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न आता साकार होणार असून, 23 सप्टेबरला नगर-बीड रेल्वे मार्गावरील रेल्वेच शुभारंभ होणार आहे.
गेली 40 वर्षे बीडकर या रेल्वेची वाट पाहत होते. मात्र कधी निधीअभावी तर कधी राजकीय इच्छाशक्तीअभावी या रेल्वेचे काम रखडले होते. मात्र सततच्या मागणीनंतर मागील सात वर्षांपूर्वी बीड रेल्वेसाठी भरघोष असा निधी उपलब्ध झाला होता. सोबतच राज्याने देखील अर्धा वाटा उचलला होता. या कामासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र आता 23 सप्टेबरला नगर-बीड रेल्वे मार्गावरील रेल्वेच शुभारंभ होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या...
Beed: तब्बल 32 तासानंतर डॉक्टर फपाळ यांचा मृतदेह सापडला