Beed News : मागच्या दोन-तीन दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर एक छोटा व्हिडीओ आला असेल ज्यामध्ये एक चार वर्षाचा चिमुकला "आमच्या पप्पांनी गणपती आणला" या गाण्यावर एक्टिंग करताना सगळ्यांनीच बघितला असेल. हे पाहून तुम्हाला हा मुलगा नेमका कोण आहे? आणि तो रातोरात कसा स्टार झाला? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याच मुलाशी एबीपी माझाने बातचीत केली आहे.
'माझ्या पप्पानी गणपती आणला' गाणं लाखो लोकांना भुरळ घालणारं आहे. गणपती बाप्पाचं हे गाणं सध्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाजत आहे. पण या गाण्यावर एक्टिंग करणारा हा चिमुकला नेमका कोण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
काही तासांतच व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओत दिसणाऱ्या या चिमुकल्याचं नाव साईराज केंद्रे असून तो फक्त चार वर्षांचा आहे. अत्यंत हुशार बुद्धी आणि उत्साही असणाऱ्या साईराजने गणपती बाप्पाच्या गाण्यावर एक रिल्स बनवली आणि ही रिल्स काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचली. आणि साईराज एका रात्रीत स्टार झाला.
अनेक भन्नाट स्टाईलच्या व्हिडीओवर थिरकलाय साईराज
साईराज केंद्रेचा हा पहिलाच व्हिडीओ नाही तर याआधीही साईराजने अनेक गाण्यांवर वेगवेगळ्या स्टाईलचे अगदी भन्नाट व्हिडीओ बनवले आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्हालाही सााईराजचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.
अगदी लहान असल्यापासूनच साईराज कलाकारी करतो त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या रिल्स बनवायला सुरुवात केली. आणि आता साईराज आणि एक्टिंगचं नातं एवढं घट्ट झालं आहे की तो एखाद्या अभिनेत्यासारखं कॅमेरा समोर येतो आणि काही क्षणात रिल्स बनवतो. तर मोठं होऊन साईराजला रितेश देशमुखसारखा अभिनय करायचा आहे असंही तो सांगतोय.
तर, आपल्या मुलाचं सगळीकडून कौतुक होतंय हे पाहिल्यानंतर साईराजच्या आई-वडिलांनाही त्याचा अभिमान वाटला. यामुळेच त्याच्या आई-वडिलांनी शिक्षणाबरोबरच त्याच्या कलेचा छंद त्याला जोपासता यावा यासाठी त्याला पूर्णपणे मदत करतायत.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :