Beed News : बीडमध्ये (Beed) शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नवोदयचा पात्रता परीक्षेमध्ये (Navodaya Eligibility Exam) एका मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून देखील या विद्यार्थ्याला नवोदय पात्रता परीक्षा देता आली नाही. संदीप मुळीक अस या विद्यार्थ्यांचं नाव आहे. हा विद्यार्थी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नवोदय परीक्षा पात्रतेसाठी त्याने फॉर्म भरला होता आणि त्यानंतर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर त्याला मराठी ऐवजी गुजराती माध्यमांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. याबद्दल त्याच्या पालकाने शिक्षकांकडे तक्रार केली. मात्र शिक्षकांनी देखील उडवाउडवीची उत्तर दिल्याने भाषेशी तडजोड करून नाविलाजाने विद्यार्थ्याला पेपर द्यावा लागला.


परीक्षेचा फॉर्म भरताना शिक्षकाने गुजराती भाषा निवडल्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती भाषेतील पेपर सोडविण्याची वेळ आली आहे. शहराच्या कालिकादेवी माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला असून, शिक्षकाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्याला बसला आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा ते दीड या वेळेत नवोदय परीक्षेचा पेपर होता. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आणि कालिकादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी नवोद्य परीक्षा दिली. दरम्यान कालिकदेवी परीक्षा केंद्रावर खोकरमोहा येथील संदीप सखाराम मुळीक हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आला होता. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका मिळाली. पण संदीपला मात्र गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिका मिळाली होती.


परीक्षा फॉर्म भरताना झाली चूक? 


गुजराती प्रश्नपत्रिका मिळाल्याचा प्रकार विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाच्या निदर्शनास देखील आणून दिला. पण परीक्षा फॉर्म भरताना माध्यम गुजराती भाषेतील भरल्यामुळे प्रश्नपत्रिका तशा प्रकारची आल्याचे त्याला सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत संदीप मुळीकला भाषेशी जुळवून घेत पेपर सोडावा लागला. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून देखील या विद्यार्थ्याला नवोदय पात्रता परीक्षा देताना गुजराती प्रश्नपत्रिका मिळाल्याने याचा मोठा फटका बसला आहे. 


शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावणार


परीक्षा फॉर्म भरताना शिक्षकांनी काळजीपूर्वक माहिती भरणे आवश्यक आहे. आपल्या एका चुकीचा विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना नाहक त्रास व्हायला नको. शैक्षणिक आयुष्यात वारंवार संधी मिळत नसतात. त्यामुळे अशा चुका व्हायला नकोत. संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी माध्यमांना दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


MPSC Student Suicide : एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI