MPSC Student Suicide : बीड जिल्ह्यात (Beed District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून,  एमपीएससीचा (MPSC) पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र पेपर अवघड गेल्याने तो चिंतेत होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. 

Continues below advertisement

याबाबत पोलीसंक्दुना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं या विद्यार्थ्यांचं नाव असून, तो मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करत होता. दरम्यान 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा देण्याससाठी तो बीडमध्ये आला होता.

तर परीक्षा दिल्यावर त्याला पेपर अवघड गेला होता. त्यामुळे तो चिंतेत होता.  तसेच रविवारी परीक्षा दिल्यानंतर तो बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला होता. पण एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर याबाबत मयत अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी फोनवरून माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

विविध विभागातील एकूण 8 हजार 169 पदे भरली जाणार 

एमपीएससीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता एकूण 4 लाख 67 हजार 85 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठकव्यवस्थेकरिता राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1 हजार 475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. सदर पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे 80% उपस्थिती असल्याचे दिसून आले. या परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण 8 हजार 169 पदे भरली जाणार असून, आयोगामार्फत विज्ञापित केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च पदसंख्या आहे. तसेच अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

पालकमंत्री काळे की गोरे शेतकऱ्यांना आजच कळलं; अतुल सावेंना स्वाभिमानीच्या पूजा मोरेंनी समोरासमोर सुनावलं