Crime News : लकी ड्रॉ च्या नावाखाली अनेक जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात चार लकी ड्रॉ चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजमध्ये शिवजयंती निमित्त साई इंटरप्राईजेसच्या नावाखाली चार जणांनी स्कॉर्पिओ, स्विफ्ट, बुलेटसह आकर्षक बक्षिसाचे आमिश दाखऊन 1 हजार 500 रुपये प्रमाणं लकी ड्रॉ च्या तिकिटांची विक्री केली होती.


1 हजार 500 रुपयाप्रमाणं लकी ड्रॉ च्या तिकिटांची विक्री


स्वतःच्या फायद्यासाठी शिवजयंती निमित्त लक्की ड्रॉ चे आयोजन करण्याची चौघा जणांनी नामी शक्कल लढवली होती. यात चारचाकी वाहनासह इतर बक्षीसांचे आमिश दाखवून फसवणूक केली आहे. या प्रकरणी साई एंटर प्रायजेसच्या चार जणाविरुद्ध सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अमोल गालफाडे, शिवराज मुथळे, राहुल शेवाळे आणि राहुल औसेकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी मिळून 1 हजार 500 रुपयाप्रमाणं लकी ड्रॉ च्या तिकिटांची विक्री केली होती. त्यातून भाग्यवान विजेत्यांना स्कॉर्पिओ, स्विफ्ट, बुलेट मोटार सायकल, टी व्ही, फ्रिज आणि इतर बक्षिसे दिली जाण्याचं आमिष दाखवले. ठरल्याप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी सोडत काढण्याचे घोषीत करुन त्यात पुन्हा बदल केल्यानं ग्राहकांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला आहे.


ज्यांच्या नावानं सोडत काढली ते ग्राहक देखील बोगस


एक दिवस अचानक त्यांनी या लकी ड्रॉ ची सोडत काढली. सोडतीतीचे व्हिडीओ चित्रीकरण केले. ते एका यु-ट्यूब चॅनल वर प्रसारीत करुन लागेच व्हिडिओ डिलीट करुन टाकला. यात पत्रकार असलेले एक ग्राहक साजेद इनामदार यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता लकी ड्रॉ च्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. ज्यांच्या नावानं सोडत काढली ते ग्राहक देखील बोगस असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या सर्व प्रकरणानंतर पत्रकार साजिद इनामदार यांच्या तक्रारीवरुन केज पोलीस ठाण्यात लकी ड्रॉ चालवणारे अमोल गालफाडे, शिवराज मुथळे, राहुल शेवाळे आणि राहुल औसेकर या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता त्यांचा शोध घेत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


महत्वाच्या बातम्या: