Beed News Update : बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. बीड तालुक्यातील नागझरी येथून उगम पावणाऱ्या बिंदुसरा नदीला देखील या पावसानं पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागझरी येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 


बीड जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे.  या पावसासह वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. काल वडवणी तालुक्यातील सतेवाडी येथील 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर डोंगर पट्ट्यातीलच मोहिंगिरवाडी येथील महिला शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची घटना आज घडली आहे. आज सायंकाळच्या सुमारास बीड तालुक्यातील बोरफडी नजिक असलेल्या मोहिंगिरवाडी येथील मोहरबाई राजेंद्र जाधव या 45 वर्षीय महिला शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 


मन्मथ स्वामी देवस्थान असलेल्या कपिलधारमध्ये देखील नदीला पूर आल्याने  अनेक गाड्या पाण्यात अडकल्या असून कपिलधार आणि बीड शहराचा संपर्क तुटला आहे. कपिलधारला दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी गेलेले अनेक भाविक नदीला पूर आल्याने अडकून पडले आहेत.  


गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाज जिह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागातील पिकं काढणीला आली आहेत. तर काही ठिकाणी पिकांची काढणी सुरू आहे. परंतु, या परतीच्या पावसाने या पिकांचं मोठं नुकसान झालंय.  


महत्वाच्या बातम्या


Hingoli News: कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती! परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 


Marathwada: राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतांना गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन