Beed: राज्यात मराठवाड्यातून मल्टिस्टेट बँकांचे घोटाळे बाहेर निघत असताना बीडमधून ज्ञाानराधा घोटाळ्यानंतर शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या साईनाथ परभणे याच्यासह दोन्ही मुलांना अखेर पुण्यातून अटक झाली. बीडमधील श्री साईराम मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून साईनाथ परभणे याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती.


साईराम पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे बुडवणारे फरार सापडले 


साई राम मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बीड जिल्ह्यात 16 शाखा आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यात 31 शाखा आहेत. या बँकेचा अध्यक्ष साईनाथ परभणे फसवणूक करून गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. याच प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून साईनाथ परभणे त्याचा मुलगा विनायक परभणे आणि कुणाल परभणे या तिघांना पुण्यातून अटक करण्यात आली. किमान आता तरी ठेवीदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवीदार व्यक्त करत आहेत.


साईनाथ परभणेवर असंख्य गुन्हे दाखल


साईराम मल्टीस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांची फसवणूक करून कोट्यवधी बुडवल्यामुळं या पतसंस्थेविरोधात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून गुन्हे दाखल होत आहेत. हजारो लोकांच्या ठेवी घेऊन फरार झालेले आरोपी साईनाथ परभणे आणि त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना अखेर पुण्यातून पोलिसांनी पकडले आहे. 


वकीलाची ३० लाखांची फसवणूक


साईराम मल्टीस्टेटचा अध्यक्षासह संचालक मंडळाने वकिलाची ३० लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २० जूलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. साईराम मल्टीस्टेटविरोधातील गुन्ह्यांचे सत्र कायम असून पोलिसांकडून आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. 


जादा व्याजाचे आमिष दाखवत फसवणूक


संचालकांनी जादा व्याजदराचे आमिष दाखविले. त्यामुळे त्यांनी श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या शाहुनगर भागातील शाखेत मुदत ठेव ठेवली. आता त्याची मुदत पूर्ण होऊनही त्यांना एक रूपयाही परत केलेला नाही. वारंवार शाखेत खेटे मारूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने ॲड.गव्हाणे यांनी शिवाजीगनर पोलिस ठाणे गाठत २० जूलै रोजी फिर्याद दिली. 


हेही वाचा:


मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यात संचालकाला पुण्यातून ठोकल्या बेड्या, पैसे बुडवून पोलिसांना देत होता गुंगारा, काय आहे प्रकरण?