Beed News Update : बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथे एका शोभेची दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सावळेश्वर पैठण या ठिकाणी शोभेची दारू बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात अचानक स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी असलेला कच्चा माल आणि तयार केलेले फटाके पूर्णपणे जळून खाक झाले असून कारखान्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिस करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली.