Beed News Update : बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बँक व्यवस्थापकाचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून बँकेत काम करणाऱ्या लिपिकाने तब्बल 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे. भरत अनारसे असे (रा.मोरेवाडी. तालुका आष्टी) या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी भरत अनारसे याच्या विरोधात विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ पांडुरंग अनारसे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. 


नवनाथ अनारसे हे बीडमधील आष्टी येथील महेश मल्टीस्टेट या बँकेचे शाखा व्यवस्थापक आहेत. संशयित भरत याने नवनाथ यांच्या मोबाईलवरील बँकेची एसएमएस सेवा बंद करून त्यांच्या युजर आयडी आणि पासवर्ड वापरला आणि त्यामधून 75 लाख 26 हजार रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वळवली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी भरत अनारसे विरोधात आष्टी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.   


हा कारनामा 11 जानेवारी 2023 ते 27 जानेवारी 2023 या काळात संशयित भरत याने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिली आहे. भरत याची कसून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीनंतरच याबाबत आणखी माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, त्याच्या खात्यावरील 75 लाख रूपये जप्त करण्यात आले आहे की, इतर काय कारवाई करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सखोल चौकशी करून संशयित भरत अनारसे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Nagpur : नागपुरात NVCC अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; बनावट मिटींग, कागदपत्रांचा वापर