बीड : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या आमदार सहकाऱ्यांसह भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट निर्माण झाले आहेत. मात्र, आता या दोन्ही गटातील नेते स्थानिक पातळीवर एकेमकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्याचीच सुरुवात बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी अजित पवार गटाचे नेते तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "राष्ट्रवादीमध्ये असताना भाजपच्या नेत्यांची मिमिक्री करणारे आता हर हर मोदी म्हणू लागले असल्याचा खोचक टोला आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच नाव न घेता लगावला आहे. 


बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुरोगामी विचाराच्या राजकारणावरुन टीका केली आहे. शरद पवारांसोबत असताना काही लोक मोठमोठी भाषण ठोकायचे. तर भाजपच्या बड्या नेत्यासारखे हातवारे देखील करुन दाखवायचे. तेच लोक आता हर हर मोदी म्हणताना दिसत आहेत आहेत, अशी खोचक टीका संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच नाव न घेता त्यांच्यावर केली आहे.


राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर 17 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार असून, याच सभेसाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. अंबाजोगाईमध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये बोलताना संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांच राजकारण हे पुरोगामी विचारांच राजकारण आहे. त्यामुळे आपण पक्ष फुटीनंतरही शरद पवारांसोबतच राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. 


शरद पवार बीडच्या दौऱ्यावर... 


राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करणाऱ्या म्हणजेच अजित पवारांच्या गटातील महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात शरद पवार सभा घेत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. तर, या सभेची तयारीची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे. त्यामुळे बीडच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Politcas: जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत