Beed News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी केलेले 18 प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने यापूर्वी दिलेली मुदत संपल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खातरजमा करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. राज्यातील 48 शहरांमध्ये एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. बीडमध्ये (Beed) एकूण किती पाकिस्तानी नागरिक आहेत, याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Navneet Kanwat) यांच्याकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
बीडमध्ये किती पाकिस्तानी नागरिक?
बीड जिल्ह्यात अवैधरीत्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची तसेच बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. याच अनुषंगाने बीड पोलिसांनी जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे तपासल्यानंतर अद्याप एकही नागरिक आढळून आलेला नाही. मात्र अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे आणि बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक
सध्या महाराष्ट्रात एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये एक स्वतंत्र वर्ग ‘अनट्रेसेबल’ नागरिकांचा आहे. ज्यांचा व्हिसाचा वैध कालावधी संपलेला असूनही ते अद्याप भारतातच आहेत. या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भारतीय यंत्रणा करत आहेत, परंतु ते कुठे आहेत याचा ठाव लागलेला नाही, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 28 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय कारणांसाठी भारतात असलेल्या नागरिकांना दोन दिवसांची सवलत देण्यात आली असून त्यांना 30 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर नागपूर शहरात सर्वाधिक 2,458 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. ठाणे शहरात 1,106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं समोर आलं आहे. यामधून फक्त 51 पाकिस्तान्यांकडेच वैध कागदपत्रं आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रात दाखल झालेल्या 107 पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा सध्या सापडलेला नाही आणि ते बेपत्ता असल्याचं उघड झालं आहे.
नाशिकमध्ये राहणाऱ्या 'त्या' पाकिस्तानी महिलांचे काय होणार?
दरम्यान, नाशिकमध्ये एकूण सहा पाकिस्तानी महिला गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. नाशिकमध्ये राहणाऱ्या सहा पाकिस्तानी महिलांबाबत पोलिसांना अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नाही. या महिलांचे विवाह झाल्याने त्या नाशिकमध्येच वास्तव्यास आहेत. या महिलांसंदर्भात अद्याप गाईडलाईन्स प्राप्त न झाल्याने पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या या पाकिस्तानी महिलांसंदर्भात काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नाशिक शहरातील अन्य दोन पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटले आहे की, महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, प्रत्येक पोलीस स्थानकाला त्यासंबंधी सूचना दिल्या जात आहेत. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात असून, जर कोणीतरी अधिक काळ महाराष्ट्रात राहताना आढळला, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार या कार्यवाहीची अंमलबजावणी केली जाईल, असे म्हटले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
1. अकोला (AKOLA) - 222. अहिल्यानगर (AHILYANAGAR) 143. अमरावती (AMRAVATI C)- 1174. अमरावती (AMRAVATI R)- 15. छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD C)- 586. छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD R) - 17. छत्रपती संभाजीनगर ( AUR. RLY) 08. भंडारा (BHANDARA 0)9. बीड (BEED)- 0 10. बुलढाणा (BULDHANA)- 711. चंद्रपूर ( CHANDRAPUR)- 012. धुळे (DHULE) 613. धारशिव (DHARASHIV)- 014. गडचिरोली (GADCHIROLI)- 015. गोंदिया (GONDIA)- 516. हिंगोली (HINGOLI)- 017. जळगाव (JALGAON)- 39318. जालना (JALNA)- 519. कोल्हापूर (KOLHAPUR) - 5820. लातूर (LATUR) - 821. मुंबई (MUMBAI RLY)- 222. मुंबई (MBVV)- 2623. नाशिक (NASHIK C)- 824. नाशिक (NASHIK R)- 225. नागपूर (NAGPUR C)- 245826. नागपूर (NAGPUR R)- 027. नागपूर (NAGPUR RL)Y 028. नांदेड (NANDED) 429. नंदुरबार (NANDURBAR)- 1030. नवी मुंबई (NAVI MUMBAI)- 23931. परभणी (PARBHANI) 332. पालघर (PALGHAR) - 133. पिंपरी चिंचवड (PIMPRICHINCHWAD) -29034. पुणे (PUNE) - 11435. पुणे (PUNE R) -036. पुणे (PUNE RLY)- 037. रायगड (RAIGAD)- 1738. रत्नागिरी (RATNAGIRI) 439. सातारा (SATARA)- 140. सांगली (SANGLI)- 641. कोल्हापूर (SOLAPUR C) - 1742. सोलापूर (SOLAPUR R) 043. सिंधुदुर्ग (SINDHUDURG) 044. ठाणे (THANE C) 110645. ठाणे (THANE R) 046. वर्धा (WARDHA) 047. वाशिम (WASHIM) 648. यवतमाळ (YAVATMAL) 14
आणखी वाचा