बीड  : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं बीड मध्ये मोठी कारवाई केली आहे. बीडमधील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बीडचे  जिल्ह्यातील माजलगाव नगपालिकेचे मुख्यमाधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना पोलिसांनी 6 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याकंडून चव्हाण यांच्या घराची तपासणी करण्यात आली आहे. चंद्रकांत चव्हाण यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कंत्राटदाराला 12 लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. विशेष बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याधिकारी चव्हाण सापडले.

चव्हाण यांच्या घराची तपासणी 

छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाख रुपयांची लाच घेताना पकडले.  छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं माजलगाव मध्ये कारवाई आहे. माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्यानंतर एसीबीनं आणखी कारवाई केली. एसीबीच्या तपासणी पथकाकडून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या घराची करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी  माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

माजलगावमध्ये खळबळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं थेट मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडलं. यानंतर पथकाच्यावतीनं चव्हाण यांच्या घराची तपासणी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच माजलगावमध्ये खळबळ उडाली आहे. ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना सापडल्यानं मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण अडचणीत आले आहेत. माजलगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्यानं  मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान अभियान योजने अंतर्गत, नगरपरिषद माजलगावातील केलेल्या सिमेंट रस्त्याचे कामाचे बिल दोन करोड काढल्याच्या मोबदल्यात 3  टक्के असे 6,00,000/- रुपये आणि राहिलेल्या उर्वरित कामांमधील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून, अडथळे दूर करून देण्यासाठी 6,00,000/- असे एकूण 12,00,000/- रुपये लाचेची मागणी चंद्रकांत चव्हाण यांनी  केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. चंद्रकांत चव्हाण यांनी त्यांच्या घरातच पैसे स्वीकारल्यानं अडचणी वाढल्या.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. लाचखोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. आता माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई होते ते पाहावं लागणार आहे.