बीड : बनावट ॲपचा (Fake App) वापर करून पैसे दाम दुप्पट करून देण्याच अमष दाखवून मामाचे 70 लाख रुपये लुटणाऱ्या भाच्याला बीडच्या सायबर पोलिसांनी (Cyber Police) गोव्यामधून अटक केली आहे. सय्यद तल्लहा सय्यद जमाल (वय 19 वर्ष, रा. बीड, ह.मु.येवलेवाडी,पुणे) असं मुख्य आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार रवींद्र गायकवाड याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे मामाची फसवणूक करून जमा केलेल्या पैशातून आरोपी गोव्यात मैत्रिणीसोबत मौजमजा करत होता. 


बीड शहरामध्ये टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे शेख इसाक यांचा भाचा सय्यद तल्लहा याने शेख इसाक यांना शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पट मिळवून देण्याचं आमिष दाखवले. तल्लहा हा नात्यातलाच असल्याने शेख इसाक यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सुरुवातीला ऑनलाईन 15 लाख रुपये पाठवले. इसाक यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर आरोपीने त्यांना पुण्याला नेऊन तेथे आपल्या साथीदारासोबत एका बनावट ॲपमध्ये नोंदणी केल्याचा दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर शेख इसाक यांनी पुन्हा 55 लाख रुपये नगदी स्वरूपात भाचा तल्लहा याला दिले. 


मामाचीच केली फसवणूक...


दरम्यान, शेअर मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवल्यानंतर काही दिवसांनी इसाक यांनी तल्लहा याच्याकडे पैशांबाबत विचारपूस केली. मात्र, त्याच्याकडून कुठलीच माहिती मिळत नसल्याने शेख इसाक यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ बीड सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला. 70 लाख रुपयाची फसवणूक झाल्याने सायबर पोलीस देखील तपासाला लागले. पोलिसांनी आरोपीचा तांत्रिक शोध सुरू केला असता तल्लहा सय्यद आणि रवींद्र गायकवाड हे त्यांच्या मैत्रिणीसह गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ एक पथक तयार करत दोघांना गोव्यातून अटक केली. 


मैत्रिणीला घेऊन गोव्यात पोहोचले


तल्लहा व यश हे दोघेही चार दिवसांपूर्वी मैत्रिणीला घेऊन गोव्यात पोहोचले. चार दिवसांसाठी अलिशान रिसॉर्टही बुक केले. कधी बागा, तर अमरूळ बीचवर धिंगाणा घातला. सोमवारीही त्यांनी बीचवर मस्ती करून हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या मैत्रिणीला समज देऊन घरी पाठविले, तर या दोघांना घेऊन पोलिस बीडला आले. 


पोलिसांनी सर्व डान्सबार व हॉटेल्स तपासले.


पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यावर तल्लहा आणि त्याचा साथीदार गोव्यात असल्याचा स्पष्ट झालं. त्यामुळे बीड पोलिस गोव्यात पोहचले. यावेळी हे दोघे मित्र बागा बीचवर असल्याचे समजले. सर्व बीच तपासला परंतु ते दोघेही कोठेही सापडले नाहीत. पोलिसांनी रात्री 9 ते पहाटे 5 यावेळेपर्यंत त्यांनी पायी फिरून सर्व डान्सबार व हॉटेल्स तपासले, तरीही ते आढळले नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना ते एका हॉटेलमध्ये सापडले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीड जाळपोळ प्रकरणी टोळीप्रमुखाला बेड्या, आरोपी शिंदेंच्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाचा नातेवाईक