बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आलापूर येथे पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली आणि घरामध्ये असलेल्या एका अंधवृद्धाचा होरपळून दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंध असलेल्या वृद्ध रामभाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले होते आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.


आलापूर येथील रामभाऊ शहाणे आणि रुक्मिणीबाई शहाणे हे दांपत्य गावात एका पत्राच्या शेडमध्ये राहत होते. रुक्मिणीबाई या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या तर अंध असलेले रामभाऊ हे आजारी असल्याने ते घरातच झोपून होते. मात्र दुपारच्या वेळी अचानक त्यांच्या शेडमध्ये आग लागली आणि काही वेळातच आग एवढी पसरली की संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी गेलं. या आगीच्या घटनेत होरपळून रामभाऊ शहाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


आग लागल्याची माहिती मिळताच गावकरी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र अंध असलेल्या रामभाऊ यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेडच्या बाहेर येता आलं नाही. त्यामुळे आग विझवण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी शेडमध्ये मृत्यू झाला. तर घरामध्ये दुसऱ्या खोलीत असलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत आग पोहोचण्या अगोदरच गावकऱ्यांनी ही आग विझवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.


भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गाव काढलं विक्रीला


गावात आधीच मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यात आलेल्या योजना कागदोपत्री दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीड (Beed) जिल्ह्यात समोर आला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला असल्याचे बॅनर लावले आहे. 


गावात कोणत्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावत गाव विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. एकूण 1800 लोकसंख्या असलेल्या या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर, गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हा भरात चर्चा सुरू आहे.


गावात करण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने, या भ्रष्टाचाराला कंटाळून ‘गाव विकणे आहे’ असा फलक गावकऱ्यांनी लावला आहे


ही बातमी वाचा: