Beed Crime: सेवेतून बडतर्फ झालेल्या पोलीस निरीक्षकाने बीडच्या (Beed News) अंबाजोगाई (Ambajogai) येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव सुनील नागरगोजे (Sunil Nagargoje) (रा. नागदरा, ता. परळी) असे आहे. सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौरी-गणपतीच्या सणानिमित्त नागरगोजे यांचे कुटुंबीय मूळगावी नागदरा येथे गेले होते. दरम्यान, अंबाजोगाईतील भाड्याच्या घरात ते एकटेच होते. रविवार (दि. 1 सप्टेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

सुनील नागरगोजे सेवेतून बडतर्फ 

सुनील नागरगोजे यांनी पोलीस खात्यात कार्यरत असताना परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. मात्र, परभणी येथे कार्यरत असताना पोलीस अधीक्षकांशी झालेल्या वादातून शिवीगाळ प्रकरण उभं राहिलं आणि त्यावर चौकशी सुरू झाली. यानंतर त्यांची बदली बीड येथे नियंत्रण कक्षात करण्यात आली. तिथेही त्यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर, एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फीनंतर नागरगोजे हे नैराश्यात गेल्याची माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

अंबाजोगाईतील घरात उचलले टोकाचे पाऊल

सध्या त्यांची मुलं पुण्यात शिक्षण घेत आहेत, अंबाजोगाई येथे नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने नागरगोजे हे भाड्याच्या घरात एकटे राहत होते. सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास सुनील नागरगोजे यांनी आपले आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.  

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

सुनील नागरगोजे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते नैराश्याने ग्रस्त होते, अशी माहिती समोर आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akola Crime : माझा नवरा घरी नाही, तुम्ही या! 52 वर्षीय सराफाला महिलेने घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्...; अकोल्यात खळबळजनक घटना

Nagpur Crime News : 40 कोटींचे सरकारी बिल थकलं, कंत्राटदारानं घरात गळ्याला लावला दोर, अभिनेता प्रभासशी कनेक्शन