बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी पळून जात असताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मदत केली असावी, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder) 9 डिसेंबर 2024 रोजी झाली. संतोष देशमुख यांचा मृतदेह गाडीतून बाहेर फेकून दिल्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ कारने धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले. येथील सीसीटीव्ही फुटेज नुकतेच समोर आले होते. वाशी येथील पारा चौकात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आणि त्याचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी सोडून पळत जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावेळी पोलिसांची गाडी आरोपींचा पाठलाग करत होती. पोलीस त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर होते. तरीही हे आरोपी पोलिसांच्या (Beed Police) हाती का लागले नाहीत? त्यावेळी पोलीस जवळपास आहे, ही टीप आरोपींना कोणी दिली होती, तो व्यक्ती पोलीस अधिकारी होता का?, असा सवाल धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये कोणताही तपास झाला नव्हता. आरोपी पळून गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज लवकर तपासले असते तर कोणत्या दिशेने केले हे समजले असते आणि त्यांना पकडता आले असते. प्रसारमाध्यमांना सीसीटीव्ही फुटेज सापडते, पण पोलिसांना ते सापडत नाही. समोरुन आरोपी पळताना दिसत आहेत मग या आरोपीला का शोधले नाही? पळून जाणाऱ्या आरोपीमध्ये कृष्ण आंधळे पण आहे. हत्येच्या सुरुवातीच्या तपासात गांभीर्याने घेतले नाही. पुढे पोलीस आहेत याची टीप कोणी दिली. याची माहिती कॉल डिटेल्समधून निघेल. कुठल्या पोलिसाने फोन करून सांगितलं होते का हेदेखील तपासले पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.


धाराशीवच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?


संतोष देशमुख यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह फेकून दिल्यानंतर 9 डिसेंबरला आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी आले होते. येथील पारा चौकात आरोपींनी त्यांची स्कॉर्पिओ गाडी सोडून दिली आणि ते जोरात पळत सुटले. कदातिच पोलीस मागे लागल्याच्या भीतीने ते वेगाने पळत असावेत, असा अंदाज आहे. या व्हिडीओत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे साथीदार असे सगळे मिळून सहाजण दिसत आहेत. 



आणखी वाचा


..आता माझाही बांध फुटलाय, संतोष देशमुख प्रकरणी 60 दिवसांनंतर धनंजय देशमुख म्हणाले, 'आता माझा भाऊ ..