Beed Crime: ओबीसी आरक्षण संपलं आता माझ्या नातवाला नोकरी लागणार नाही.. या नैराश्यातून बर्दापूर येथील निवृत्ती पांडुरंग यादव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.. निवृत्ती यादव हे गावात पारावर सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होत आता ओबीसींचे आरक्षण संपले म्हणून निराशा व्यक्त करत होते.. यादरम्यानच त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.. (OBC Reservation Sucide)

Continues below advertisement


नेमकं घडलं काय? 


ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यात बर्दापूर येथील निवृत्ती पांडुरंग यादव यांनी आत्महत्या केली. निवृत्ती यादव यांनी आपल्या नातवाला नोकरी लागणार नाही, अशी चिंता व्यक्त करत ताणात येऊन शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना बीड जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशी संबंधित दुसरी आत्महत्या ठरली आहे. यापूर्वी, नाथापूर येथील एका व्यक्तीनेही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली होती.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती यादव हे बर्दापूर गावातील पारावर सुरू असलेल्या चर्चेत नियमित सहभागी होत. ते ओबीसी आरक्षण संपल्यामुळे त्यांच्या नातवाला भविष्यात नोकरी मिळणार नाही, या विचाराने चिंताग्रस्त होते. या नैराश्यातून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांनी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना दिली.


ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य


 काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील नाथापुर गावात गोरख नारायण देवडकर या 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतून  या व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. गोरख देवडकर यांना पाच मुली असून दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल? असा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात देवडकर यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून राज्य सरकारने आमच्या कुटुंबाचा विचार करावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.


तसेच धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा गावात 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत शेतकऱ्याचे नाव माणिकराव डोईफोडे असे असून, ओबीसी आरक्षण जाणार या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.