Beed : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, या दौऱ्या दरम्यान मंत्र्यांच्या जाणाऱ्या मार्गावर असलेल्या धोकादायक विद्युत रोहित्राला कापड्याने झाकून घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. बीड शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर रोहित्र आहेत. जे अत्यंत धोकादायक आहेत. अनेकदा या ठिकाणी अपघात देखील झाल्याची बाब समोर आली होती. 

Continues below advertisement

आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या विद्युत रोहित्राला कपड्याने झाकून घेण्यात आले आहे. मंत्र्यांच्या निदर्शनास विशेषतः अजित दादांना हे दिसू नये याची पुरेपूर जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली होती. खरी बाब झाकून घेतली असली तरी प्रशासनाचा हा केविलवाना प्रयत्न समोर आला आहे. 

बीडकरांचे स्वप्न सत्यात उतरले, बीड ते अहिल्यानगर मार्गावर पहिली रेल्वे धावली

मराठवाड्याच्या चारही बाजूंनी रेल्वेचं जाळं पसरलं होतं, पण बीड जिल्हा रेल्वे कनेक्टीव्हीटीपासून वंचित होता. त्यामुळे, बीडमध्येही झूक झूक आगीनगाडी आली पाहिजे, असे स्वप्न येथील प्रत्येकाने पाहिलं होतं. बीडमधील लोकप्रतिनीधींनीही बीडच्या रेल्वेचं स्वप्न पाहिलं अन् ते स्वप्नात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर, आज 17 सप्टेंबर 2026 रोजी बीडकरांचे हे स्वप्न सत्यात उतरले असून बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे धावत आहे. या बीड रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. 

Continues below advertisement

बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार

बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या 167 किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे, बीड ते अहिल्यानगर रेल्वेने बीडकरांना प्रवास करता येईल, विशेष म्हणजे या प्रवासाचे तिकीटदरही समोर आले असून कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच, बीडहून केवळ 40 रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण 15 रेल्वे स्थानक असणार आहे. पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीडवरुन फक्त 10 रुपयांत येथे जाता येईल. अहिल्यानगर-बीड-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग 261 किमीचा आहे. त्यापैकी, आज फक्त बीड-अहिल्यानगर या 166 किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अद्याप बाकी आहे.

बीडच्या रेल्वेची नेमकी वैशिष्ट्य काय?

अहिल्यानगर-बीड-परळी हा 261 किलोमीटरच रेल्वे लोहमार्ग आहे.

अहिल्यानगर ते बीड 167 किमी रेल्वेमार्गाचे आज लोकार्पण

अहिल्यानगर बीड मार्गादरम्यान 16 रेल्वे स्थानक असणार आहेत.

बीडच्या पालवण भागात बीड रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे.

अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवासाला 5 तासांचा अवधी लागणार आहे.

बीड ते अहिल्यानगर रेल्वे प्रवासाला 40 रुपये तिकीट भाडे आकारण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये