Beed Accident: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर भीषण अपघात झालाय. दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडलीय. लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री 7.30च्या सुमारास हा अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाला, तर दोघांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालाय. (Beed)
या अपघातात अभय सतीश चव्हाण (रा. बर्दापूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील फारूख रहिमखाँ पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर हातोला रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा चक्काचुर झालाय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं. अपघाताची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
तीन जणांचा मृत्यू
या अपघातात अभय सतीश चव्हाण (रा. बर्दापूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील फारूख रहिमखाँ पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्या. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: