मुंबई : शेतकऱ्यांना ई-पेमेंटद्वारे खते, बि-बियाण्यांची खरेदी करता यावी, यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार बँकांनी शेतकऱ्यांना ई-पेमेंट खरेदी करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.


बँकांनी यासाठी एक खास नमुना अर्ज तयार केला आहे. खरेदी करण्यापूर्वी शेतकरी रोखीने व्यवहार करण्याऐवजी थेट विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा करु शकतात. शेतकऱ्याकडे रोख पैसे नसले तरीही बँक खात्यातील किंवा कर्ज खात्यातील रक्कम थेट विक्रेत्याच्या खात्यात जमा करुन खरेदीचे व्यवहार करता येतील.

काय आहे ई-पेमेंट सुविधा?


  • शेतकऱ्यांना ज्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे, खते किंवा कोणतीही वस्तू खरेदी करायची आहे, त्याचं कोटेशन घ्यावं.

  • कोटेशनसोबत बँकेचा नमुना अर्ज म्हणजेच अधिकारपत्र असणं गरजेचं आहे. संबंधित बँकेमध्ये हा नमुना अर्ज मिळेल.

  • नमुना अर्ज हा कृषी सेवा केंद्राच्या म्हणजेच विक्रेत्याच्या खात्याच्या तपशिलासह भरुन आपलं खातं असलेल्या बँकेत जमा करावा.

  • बँकेकडून शेतकऱ्याच्या खात्यातील रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल. त्याची प्रत शेतकऱ्यांना मिळेल. ही प्रत कृषी सेवा केंद्रामध्ये दाखवून खरेदी करता येईल.