मुंबई : दिवसाचे 18-20 तास ऑन ड्युटी राहून नागरिकांची मदत करणाऱ्या पोलिसांच्या मदतीला टॅक्सीचालक धावून आले आहेत. महत्त्वाच्या दिवशी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना रात्री घरपोच मोफत टॅक्सीसेवा देण्यात येणार आहे.
बंदोबस्तातून परत येत असताना पोलिसांनी टॅक्सीचालकाकडे मागणी केल्यास त्यांना इच्छित ठिकाणापर्यंत सेवा देऊ, अशी घोषणा भगवान टॅक्सी महासंघाच्या अध्यक्षांनी केली आहे.
बरेचदा बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची रात्री-बेरात्री घरी परतताना गैरसोय होते. मोठा फौजफाटा असल्यानं प्रत्येक पोलिसाला घरापर्यंत पोहचवणं पोलिस विभागाला शक्य होत नाही.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना होणाऱ्या त्रासासंदर्भात पोलिसांच्या पत्नींचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब सानप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.