एकीकडे शेतकरी संपाला पाठिंबा देऊन दुसरीकडे दूध संघ सुरु असल्याने बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली जात आहे. कारण संगमनेर येथील राजहंस दूध संघाच्या गाड्या पोलीस बंदोबस्तात औरंगाबादला रवाना करण्यात आल्या.
संगमनेर येथून प्रत्येक तालुक्यात पोलीस बंदोबस्तात दूध पाठवण्यात आलं. तर अकोले तालुक्यात राजसंह दूध संघाचे टँकर शेतकऱ्यांनी रस्त्यावर रिकामे केले.
राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
संबंधित बातम्या :