बीड: आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad Mcoca) आज अखेर मकोका (Mcoca) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या एकंदरीत प्रकरणावर सातत्याने भाष्य करत आरोपांच्या फैरी झाडणारे बीड लोकसभा मतदारसंघाचे (Beed Lok Sabha) शरद पवार यांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीसांना वाल्मिक कराड यांचा संबंध आधी ज्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालीय त्यांच्याशी आढळल्याने वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असावी. असा तर्क बजरंग सोनवणे यांनी लावला आहे.
वाल्मिक कराडने हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात आढळले असल्याने हत्येच्या आरोपात देखील वाल्मिक कराड वर गुन्हा दाखल होईल, असे वाटतंय. धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी विरोधक करत असले तरी मी कुणाच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. कारण तपासात सगळं समोर येईल. असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याबाबत विधान केलं आहे.
वाल्मिक कराडच्या आई बद्दल मी काहीही बोलणार नाही
तसेच वाल्मिक कराडच्या आई बद्दल मी काहीही बोलणार नाही. परळीत तणाव नाही केवळ दहा बारा जणांनी दुकानं बंद करायला लावलीत. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद नव्हता. आता तो राजकारणासाठी निर्माण केला गेलाय असेही ते म्हणाले.
समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये रस्त्यांवर टायर पेटवल्या आणि परळी बंदची हाक दिली. ऐन संक्रांतीच्या दिवशीच परळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या सातही आरोपींना मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती बिघडली
तर आज सकाळपासून वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्याचे दिसून आले. लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र, कराडच्या मातोश्री पारुबाई यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली अजे. त्या रस्त्यात चक्कर येईन पडल्याचे समजते. जमलेल्या समर्थकांनी त्यांना पाणी दिलं, रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र मुलाला न्याय मिळावा, म्हणून त्या सतत्याने मागणी करत असल्याचे दिसून येते.
ही बातमी वाचा: