ठाणे: उल्हास नदीत चिमुकल्या मुलीला फेकणाऱ्या सावत्र पित्याचा अखेर ठाणे पोलिसांना शोध लागला आहे. तुळशीराम सैनी यानं मुलीला फेकल्यानंतर मोबाईल बंद करून धूम ठोकली होती. मात्र, त्याने मोबाईल सुरु केल्यांनं वर्तकनगर पोलिसांनी माग काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

न्यायालयानं त्याला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वालीवली-एरजंडाजवळील पुलाखाली नदीत वाढलेल्या जलपर्णीवर 30 जून रोजी एकता सैनी ही सहा वर्षांची चिमुकली तरंगत असल्याचं आढळल्यानं काही नागरिकांनी तिला दोरखंड बांधून वाचवलं होतं.

 

बापानं नदीत फेकलेल्या बदलापूरच्या बहादूर मुलीची कहाणी!


 

एकता ही ठाण्यातील लोकमान्यनगर येथील राहणारी असल्याचं कळल्यानंतर खरा प्रकार समोर आला होता.पत्नीशी झालेल्या वादातून तिचा सावत्र बाप तुळशीराम यानेच तिचं बुधवारी अपहरण केले होते. त्यानंतर तिला त्याने नदीत फेकलं होतं.