Best Scooters in 2022: वर्ष 2022 मध्ये अनेक नवीन स्कूटर लॉन्च झाल्या आहेत. भारतात स्कूटरची मोठी विक्री होते आणि अनेक लोक हे स्कूटर खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. कारण दुचाकी सेगमेंटमध्ये बाईकपेक्षा स्कूटर चालवणं हे तुलनेने सोप्प आणि सोयीस्कर आहे. अशातच 2022 मध्ये लॉन्च झालेल्या काही स्कूटरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांना लोकांची खूप पसंती मिळाली आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत देखील या स्कूटरर्सची खूप चर्चा झाली आहे. चला तर जाणून घेऊ, कोणत्या आहेत या स्कूटर आणि किती आहे यांच्या किंमती...  

  


Hero Vida V1 Pro: विडा व्ही 1 प्रो   


Hero MotoCorp ने त्यांच्या सब-ब्रँड Vida अंतर्गत त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर यावर्षी लॉन्च केली. ही V1 आणि V1 Pro या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. प्रो व्हेरियंटमध्ये 3.94 kWh पोर्टेबल बॅटरी वापरली गेली आहे. याला 165 किमीची रेंज मिळते. याचा कमाल वेग 80 किमी/तास आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख ते 1.59 लाख रुपये आहे.


Bmw C 400 Gt: बीएमडब्लू सी 400 जीटी  


BMW Motorrad ने गेल्या वर्षाच्या अखेरीस देशात जबरदस्त पॉवरफुल इंजिन असलेली C 400 GT मॅक्सी स्कूटर लॉन्च केली होती. यामध्ये 350 सीसी वॉटर कूल्ड सिंगल-सिलेंडर फोर-स्ट्रोक इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 34 एचपी पॉवर जनरेट करते. याची टॉप स्पीड 139 किमी/तास आहे. ही स्कूटर फक्त 9.5 सेकंदात 0-100 किमीचा वेग पकडू शकते. याची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपये आहे.


Ather 450X Gen 3: एथर 450 एक्स जेन 3 


एथरच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला 74Ah/3.7 kW क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो. या स्कूटरची रेंज 146 किमी प्रति चार्ज आहे. यामध्ये अनेक रायडिंग मोड उपलब्ध आहेत. ज्यामध्ये राइड, स्मार्ट इको, वार्प, स्पोर्ट आणि इको मोड समाविष्ट आहेत. याचा कमाल वेग 80 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी साडेचार तास लागतात.


Ola S1 Pro: ओला एस1 प्रो 


ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर सारख्या तीन राइड मोडसह 3.97 kWh बॅटरी पॅक मिळतो. याची रेंज 181 किमी/चार्ज आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी साडेसहा तास लागतात. याचे तीन प्रकार उपलब्ध आहेत. ज्यात S1 Pro, S1 आणि S1 Air चा समावेश आहे. याची एक्स-शोरूम किंमत 85,099 रुपये ते 1,20,149 रुपये आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI