Toyota Legender vs Fortuner : टोयोटाची लेजेंडर SUV ही कंपनीच्या फॉर्च्युनरचे अधिक अपडेटेड मॉडेल आहे. ज्यामध्ये इंटर्नल आणि एक्सटर्नल आणि बाहेर अनेक कॉस्मेटिक बिट देण्यात आले आहेत. जे या कारला अधिक आकर्षक बनवतात. तर, स्टँडर्ड टोयोटा फॉर्च्युनरच्या तुलनेत लेजेंडरची किंमत 5.4 लाख रुपये प्रीमियम आहे. या कारची नेमकी वैशिष्ट्य कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


लेजेंडरला कारला बाहेरून एक अलॉय व्हील डिझाईन, स्पोर्टियर बंपर, स्लिमर हेडलॅम्प आणि एक अनोखी फ्रंट ग्रिल मिळते. याशिवाय, यात स्टायलिश टर्न इंडिकेटर आणि कलरफुल पेंट स्कीम देखील मिळतो. फॉर्च्युनर ही 7 सीटर, 4 सिलेंडर कार आहे. त्याची लांबी 4795 मिमी, रुंदी 1855 मिमी आणि व्हीलबेस 2745 मिमी आहे.


कारचा लूक कसा आहे?




इंटर्नल बाजूस, लिजेंडरला मरुण कलर कॉन्ट्रास्ट स्टिचिंगसह ब्लॅक आणि मरून कलर कॉम्बिनेशन मिळते. तर, स्टँडर्ड फॉर्च्युनरला पूर्णपणे ब्लॅक कलरच्या किंवा कॅमोइस इंटीरियरचा पर्याय मिळतो. या व्यतिरिक्त, लेजेंडरला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (स्टँडर्ड फॉर्च्युनरवर ब्लू), मागील USB चार्जिंग पोर्ट, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, अॅम्बियंट लाइटिंग, ऑटो-डिमिंग इंटीरियर रिअर-व्ह्यू मिरर आणि हँड्स-फ्री टेल-गेटसाठी ब्लॅक डायल देखील मिळतात. या फरकांव्यतिरिक्त, फॉर्च्युनर आणि लेजेंडरमध्ये प्लॅटफॉर्म, इंटीरियर बिट्स, पॉवरट्रेन पर्याय यांसारख्या गोष्टी सामान्य आहेत. 


खरंतर, लेजेंडर आणि फॉर्च्युनरमधील एकाची निवड करणं हे पूर्णत: ग्राहकांच्या आवडीनुसार अवलंबून आहे. स्पोर्टियर, अपमार्केट टच आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह, लीजेंड मानक फॉर्च्युनरपेक्षा अधिक आकर्षक आहे.


पावरट्रेन




Toyota च्या Fortuner SUV मध्ये 2.7L पेट्रोल आणि 2.8L डिझेल इंजिन आहे. लिजेंडरमध्ये फक्त डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचे 2755cc 4 सिलेंडर डिझेल इंजिन 3000-3400rpm वर 201.15bhp पॉवर आणि 1600-2800rpm वर 500Nm टॉर्क जनरेट करते. लेजेंडरला मानक म्हणून 4 व्हील ड्राइव्ह प्रणाली मिळते. Legender हा या लाइनअपचा टॉप-एंड प्रकार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. 50.74 लाख आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Ethanol Fueled Car: पूर्णपणे इथेनॉलवर धावणारी जगातील पहिली कार! नितीन गडकरींनी केली नवीन कार लाँच; पाहा फिचर्स


Car loan Information:

Calculate Car Loan EMI