Toyota Innova Hycross: Toyota ने डिसेंबर 2022 मध्ये आपली नवीन Innova Hycross लॉन्च केली. मात्र लॉन्च होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये याची बुकिंग सुरु झाली होती. ही कार एकूण 5 ट्रिम्स G, GX, VX, ZX आणि ZX (O) मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. VX, ZX आणि ZX (O) ट्रिम हायब्रिड इंजिनसह येतात. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 18.3 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 28.97 लाख रुपये आहे. आता कंपनीने याची डिलिव्हरी सुरू केली आहे. या कारसाठी किमान प्रतीक्षा कालावधी 6 महिने आहे. तर काही प्रकारांसाठी तुम्हाला 12 महिने प्रतीक्षा करावी लागेल. ही एमपीव्ही अनेक स्मार्ट फीचर्ससह अॅडव्हान्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅगसह ADAS तंत्रज्ञान आहे.


टोयोटा इनोव्हा हायक्रॉस लूक


टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या लूक आणि डिझाइनबद्दल सांगायचे तर कंपनीने याला अतिशय बोल्ड लूक दिला आहे. यात चंकी बंपर, हनीकॉम्ब मेश ग्रिल, स्लीकर हेडलॅम्प आणि स्टेट प्रोफाइल आहे, ज्यामुळे ही अतिशय आकर्षक दिसते. कारला मोठे 18-इंच मिक्स मेटल, पातळ बॉडी क्लेडिंग, टेपरिंग रूफ, 100 मिमी लांब व्हीलबेस, रॅपराउंड एलईडी टेललाइट्स मिळतात. ही कार मारुतीच्या XL6, Ertiga चे टॉप व्हेरिएंट, इनोव्हा क्रिस्टा यासह अनेक 6-7 सीटर कारशी स्पर्धा करेल.


टोयोटा इनोव्हा हायक्रॉस इंजिन


टोयोटा इनोव्हा हायक्रॉस दोन पॉवरट्रेनसह ऑफर केली आहे. यात पहिले इंजिन 2.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 174PS पॉवर आणि 205Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ट्रान्समिशनसाठी या व्हेरिएंटला CVT गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. दुसरे 2.0-लिटर मजबूत हायब्रिड इंजिन आहे. हे 113PS मोटरसह 152PS पॉवर आणि 187Nm टॉर्क जनरेट करते. हे ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही कार 21.1kmpl मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे.


टोयोटा इनोव्हा हायक्रॉस इंटिरियर


टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. यामध्ये JBL साउंड सिस्टीम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अॅडजस्टेबल कॅप्टन सीट्स, ड्युअल 10-इंच रीअर टचस्क्रीन सिस्टीम, ADAS फीचर्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि सनरूफचा समावेश आहे. सुरक्षेसाठी यात 6 एअरबॅग आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Tata Cars Price Hike: टाटा पुन्हा वाढवणार आपल्या वाहनांची किंमत, जाणून घ्या कोणत्या कारवर किती झाली दरवाढ


Car loan Information:

Calculate Car Loan EMI