Honda Flex Fuel Bike : होंडा मोटरसायकल (Honda) इंडिया लवकरच देशात फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेली नवीन बाइक लॉन्च करणार आहे. होंडा टू-व्हीलर्सने जाहीर केले की, कंपनीची पहिली फ्लेक्स इंधन मोटरसायकल पुढील दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी येईल. या दरम्यान कोणतीही नवीन फ्लेक्स फ्युएल बाईक लॉन्च केली नाही, तर TVS Apache RTR 200 FI E100 द्वारे या इंजिनसह बाइक आणणारी Honda ही दुसरी कंपनी असेल. मात्र, या नवीन इंजिनसह कोणते मॉडेल दिले जाईल याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.


आधीच विदेशी मार्केटमध्ये विक्री
होंडाने याआधीही फ्लेक्स फ्युएल इंजिनवर काम करण्याबाबत घोषणा केली होती. याशिवाय, होंडा आधीच ब्राझीलच्या बाजारपेठेत फ्लेक्स इंधन इंजिन असलेल्या बाईक विकत आहे. कंपनी भारतात एक किंवा अनेक बाईक लाँच करू शकते. ज्या पेट्रोलसोबत इथेनॉलवर चालवल्या जाऊ शकतात.


काय आहे इथेनॉल?
इथेनॉल हे उसापासून बनवलेले अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळले जाते, ते साखरेपासून देखील तयार केले जाऊ शकते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने ते मिश्रित इंधन बनते, नंतर ते कमी प्रदूषण पसरते आणि ते मिळाल्यावर पेट्रोलची किंमत कमी होते.


केंद्र सरकार यावर भर देत आहे
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे म्हणणे आहे की, सरकार यावर भर देत असताना फ्लेक्स फ्युएल बाईक लाँच केली जात आहे. प्राणघातक बनलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्व वाहन निर्मात्यांना स्वच्छ आणि पर्यायी इंधनावरील वाहने सादर करण्यास सांगितले आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे याबाबत अत्यंत गंभीर असून गांभीर्याने निर्णय घेत आहेत.


महत्वाच्या बातम्या : 


Okaya Electric Scooter: ओकायाने लॉन्च केले 2 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि रेंज


 


Car loan Information:
Calculate Car Loan EMI


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI