Tvs Ntorq 125 Race Edition: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात आपल्या Ntorq 125 Race Edition ला नवीन रंग पर्यायसह लॉन्च केले आहे. कंपनीनी आपली ही स्कूटर मरीन ब्लू रंगात लॉन्च केली आहे. ही स्कूटर कंपनीने ब्लॅक, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू अशा रंग पर्यायसह सादर केली आहे. चाल तर या स्कूटर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
किंमत आणि बुकिंग
मरीन ब्लू मधील नवीन TVS Ntorq 125 रेस एडिशनची किंमत रु.87,011 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या नवीन स्कूटरसाठी TVS मोटर कंपनीच्या संपूर्ण भारतातील अधिकृत डीलरशिपवर बुकिंग सुरू झाली आहे. स्टेल्थ विमानाच्या डिझाईनपासून प्रेरित TVS Ntorq 125 Race Edition ला सिग्नेचर LED टेल आणि हेडलॅम्प्ससह एका आक्रमक स्टाईल मिळतो. स्कूटरवर 'रेस एडिशन' बॅजिंग देखील देण्यात आली आहे. स्कूटरला स्पोर्टी स्टब मफलर, टेक्सचर्ड फ्लोअरबोर्ड या स्कूटरला अधिक आकर्षक बनवतात.
TVS NTORQ 125 Race Edition TVS SmartXonnect सह येते. जे रायडरला त्यांच्या स्मार्टफोनला स्कूटरशी जोडण्यास मदत करते. यात अनेक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहे. 60 हून अधिक फीचर्ससह सुसज्ज असलेल्या संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरद्वारे ही स्कूटर ऍक्सेस केली जाऊ शकते. मिस्ड कॉल अलर्ट, मेसेज आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स याच्या डिस्प्लेवर उपलब्ध आहेत. स्कूटरमध्ये लास्ट पार्क केलेले लोकेशन असिस्ट, राइड स्टॅटिस्टिक्स आणि व्हॉईस असिस्ट सारखी फीचर्स देखील आहेत. जी 15 व्हॉईस कमांडला सपोर्ट करतात. स्कूटरला इंजिन-किल स्विच, पास-बाय स्विच आणि हाय-स्पीड अलर्ट देखील मिळतो.
TVS Ntorq 125 Race Edition मध्ये 124.8 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 3-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड SOHC, फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे 7,000rpm वर 9.38 Bhp पीक पॉवर आणि 7,000rpm वर 10.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. रेस एडिशनचा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर फक्त 9 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडते.
फीचर्स
TVS Ntorq 125 Race Edition मध्ये पास बाय स्विच, ड्युअल साइड स्टीयरिंग लॉक, पार्किंग ब्रेक आणि इंजिन किल स्विच यासारखी प्रमुख फीचर्स आहेत. याशिवाय स्कूटरमध्ये USB चार्जर, एक मोठा 20-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि TVS पेटंट EZ सेंटर स्टँड मिळतो. TVS Ntorq 125 22-लिटरची बूट स्पेस मिळतो. तर याचा ग्राउंड क्लीयरन्स 155 मिमी आहे. भारतीय बाजारपेठेत TVS Ntorq 125 ची स्पर्धा Suzuki Avnis 125, Yamaha RAZR, Honda Grazia 125 आणि Aprilia SXR 125 शी आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI