Tvs Iqube 2022 Vs Ola S1 pro Comparison: प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएसने नुकतीच आपली नवीन iQube इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. नवीन अपडेटसह आता स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स ही ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच ग्राहकांना यात एक मोठा बॅटरी पॅक देखील मिळणार आहे. भारतीय बाजारात अपडेटेड iQube ची टक्कर ही Ola S1 शी होणार आहे,  जी भारतीय बाजारपेठेतील या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आज आपण याच दोन स्कूटरची तुलना करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोणती स्कूटर आहे बेस्ट...    


फीचर्स 


नवीन TVS iQube ई-स्कूटर फीचर्सच्या बाबतीत बरेच अपडेट केले गेले आहेत. याला आता 5-इंचाचा पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो, तर 'S' व्हेरियंटला त्याऐवजी 7-इंचाची मोठी स्क्रीन मिळते. 'ST' प्रकाराला 7-इंचाची टचस्क्रीन मिळते. ST प्रकारात 32-लिटर स्टोरेज देण्यात आलेआहे, तर इतर दोन मॉडेलमध्ये 17-लिटर स्टोरेज मिळते. तसेच, S आणि ST प्रकारांमध्ये रीअर सस्पेंशन उपलब्ध आहे. याशिवाय अँटी थेफ्ट अलर्ट, क्रॅश अलर्ट, लाइव्ह व्हेईकल ट्रॅकिंग, सर्व्हिस अलर्ट, इनकमिंग कॉल/मेसेज अलर्ट, नेव्हिगेशन असिस्ट, लास्ट पार्क केलेले लोकेशन, कार्बन फूटप्रिंट ट्रॅकर हे फीचर्स iCube मध्ये उपलब्ध आहेत.


Ola S1 मध्ये संपूर्ण LED लाइटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्ले यासारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत. याचा डिस्प्ले 3GB RAM सह जोडलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. ही स्कूटर वायफाय, ब्लूटूथ आणि 4जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. S1 Pro मध्ये क्रूझ कंट्रोल, व्हॉईस असिस्ट आणि हिल होल्ड सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.


रेंज 


TVS iQube मध्ये 5.1 kWh चा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एका चार्जवर 145 किमीची रेंज देऊ शकते. तर Ola S1 मध्ये 3.97kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, यामध्ये यूजर्सना एका चार्जमध्ये 181 किमीची रेंज मिळते.


किंमत 


iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 98,564 पासून सुरू होते. ही स्कूटर TVS iQube, iQube S आणि iQube ST या तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. एस व्हेरियंटची किंमत 1,08,690 रुपये आहे, तर एसटी व्हेरिएंटची किंमत अद्याप उघड झालेली नाही. दुसरीकडे Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत नुकतीच वाढ करण्यात आली आहे. Ola Electric S1 Pro ची नवीन किंमत आता 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते.


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI