Toyota Glanza CNG: आघाडीची कार उत्पादक कंपनी टोयोटाने आता सीएनजी सेगमेंटमध्ये आपली नवीन कार लॉन्च केली आहे. कंपनीने ग्लान्झा हॅचबॅक आणि नुकतीच लॉन्च झालेली अर्बन क्रूझर हायरायडर एसयूव्ही सीएनजीमध्ये आणण्याची माहिती दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, टोयोटा आपल्या दोन्ही मॉडेल्सच्या ग्राहकांना इको-फ्रेंडली पर्याय देऊ इच्छिते. कंपनी 'एस' आणि 'जी' सीएनजी ग्रेडमध्ये सीएनजी कार उपलब्ध करून देणार आहे. CNG ट्रिमसोबत फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध असेल.
टोयोटाने ग्लान्झा सीएनजीच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. Glanza S CNG ची किंमत 8,43,000 रुपये आहे, तर Glanza G CNG ची किंमत 9,46,000 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आधारावर लागू आहेत. अर्बन क्रूझर हायरायडर सीएनजीच्या किमती लवकरच जाहीर केल्या जातील, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आपल्या सर्व अधिकृत डीलरशिपवर दोन्ही CNG मॉडेल्सची बुकिंग सुरु केली आहे.
Glanza CNG त्याच्या सध्याच्या इंधन कार्यक्षम K-सिरीज इंजिनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हे 1197cc इंजिन आहे. जे 77.5 PS ची पॉवर जनरेट करते. हे इंजिन उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी देखील ओळखले जाते. मारुती सुझुकी हेच इंजिन बलेनोमध्ये वापरत आहे. टोयोटाने दावा केला आहे की, ग्लान्झा 1 किलो सीएनजीवर 30.61 किमी मायलेज देऊ शकते. सीएनजी वाहनांच्या घोषणेसह, कंपनीने या क्षेत्रातील दिग्गज मारुती सुझुकी आणि ह्युंदाईला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. टोयोटाने या वर्षाच्या सुरुवातीला ग्लान्झा फेसलिफ्ट लॉन्च केली होती. मारुती बलेनोला हॅचबॅक 6.59 लाख (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे.
अशातच अर्बन क्रूझर हायरायडरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये ही कार लॉन्च केली होती. कंपनीने ही SUV 10.48 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून दिली आहे. सीएनजी ट्रिममध्ये, ही एसयूव्ही 1.5-लीटर के-सिरीज इंजिनसह मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडली जाईल. कंपनीचा दावा आहे की, हायराइडर सीएनजी 1 किलो सीएनजीवर 26.1 किमी मायलेज देऊ शकते. अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये कंपनीने एलईडी प्रोजेक्ट हेडलॅम्प्स, ट्विन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्स, रुंद ट्रॅपेझॉइडल लोअर ग्रिल, स्लीक आणि डायनॅमिक R17 अलॉय व्हील, एलईडी टेल लॅम्प्स मिळतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
Mercedes-Benz भारतात डिसेंबर महिन्यात लॉन्च करणार दोन नवीन एसयूव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Car loan Information:
Calculate Car Loan EMI