Toyota Fortuner Launch: प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Toyota ने भारतीय बाजारात GR Sport (GR-S) चा टॉप-स्पेक प्रकार लॉन्च केला आहे. कंपनीने याची किंमत 48.43 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवली आहे. तर Toyota Fortuner GR Sport स्टँडर्ड 4X4 फॉर्च्युनर लिजेंडपेक्षा 3.8 लाख रुपये अधिक महाग आहे.


ही एसयूव्ही दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात व्हाइट पर्ल क्रिस्टल आणि अॅटिट्यूड ब्लॅक यांचा समावेश आहे. यात अनेक मॅकेनिकल आणि कॉस्मेटिक अपडेट देण्यात आले आहेत. टोयोटा फॉर्च्युनर लीजेंड 4X2 आणि 4X4 ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, तर नवीन GR स्पोर्ट पूर्णपणे 4X4 ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.


लीजेंडच्या आधारे नवीन फॉर्च्युनर जीआर स्पोर्टमध्ये नवीन एअर डॅम, नवीन फॉग लॅम्प क्लस्टर आणि फ्रंट फॅसिआवर जीआर बॅजिंगसह सुधारित बंपर मिळतो. याचे साइड प्रोफाईल ड्युअल-टोन अलॉय व्हील्सने जोडलेले आहे. मागील बाजूस टेल-लॅम्प आणि नवीन बंपरसह रनिंग बॉडी कलर ट्रिम आहे. तसेच फॉर्च्युनर GR-S ला GR लोगोसह लाल ब्रेक कॅलिपर मिळतात.


याच्या केबिनच्या आत SUV ला ब्लॅक लेदर स्यूडे अपहोल्स्ट्री, हेडरेस्टवर जीआर लेटरिंग, पुश स्टार्ट/स्टॉप बटणावर जीआर लेटरिंग, जीआर लोगोसह मल्टी-फंक्शनल स्टिअरिंग व्हील आणि बरेच काही मिळते. इतर फीचर्समध्ये 8-इंच टचस्क्रीन, JBL साउंड सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि जेश्चर-कंट्रोल टेलगेट यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने टोयोटा फॉर्च्युनर जीआर स्पोर्टमध्ये 7 एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, स्टॅबिलिटी कंट्रोल आणि बरेच काही आहे. कंपनीने यात सस्पेन्शन सेट-अप सुधारित केले असताना यात तेच इंजिन देण्यात आले आहे. 


इंजिन 


या नवीन SUV मध्ये 2.8-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 3000-3400 rpm वर 201 hp पॉवर आणि 1600-2800 rpm वर 500 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI