Mahindra Scorpio Z101 : महिंद्राने नवीन जनरेशनची Scorpio Z101 बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. यापूर्वी महिंद्राने थार (Mahindra Thar Car) ही कार लॉन्च केली होती. या कारला अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता महिंद्राने scorpio Z101 च्या रूपात नवीन कार आणली आहे. ही कार लवकरच लॉन्च होण्यास सज्ज आहे. या कारचे कोणते वैशिष्ट्य आहेत ते जाणून घ्या.   


Mahindra Scorpio Z101 Features : 


नवीन महिंद्रा स्कोर्पिओचा फ्रंट ग्रिल पूर्णपणे सुधारित करण्यात आला आहे. असे दिसते की, नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ अगदी नवीन लोगोसह येईल जो महिंद्रा XUV700 वर डेब्यू करण्यात आला आहे. यामध्ये क्रोम सुशोभित वर्टिकल स्लॅट्समध्ये ड्युअल-बीम एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत. जे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह जोडले गेले आहेत. कारच्या इंटर्नल आणि एक्स्टर्नल लूक बद्दल बोलायचे झाल्यास ही कार एकदम हवेशीर आहे. एसयूव्हीला फॉग लॅम्प्सभोवती सी-टाइप क्रोम ट्रिम मिळण्याची अपेक्षा आहे.


साइड प्रोफाईलवरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, SUV स्पोर्टी अलॉय व्हील आणि कर्वी बेल्टलाइनसह येईल. जी Mahindra XUV700 सारखीच आहे. बेल्टलाइनला सी-पिलरपासून डी-पिलरपर्यंत आणि टेलगेटच्या पलीकडे एक छोटीशी किंक मिळते जी बाजूला हिंग्ड असते आणि आउटगोइंग मॉडेलपेक्षा थोडी वेगळी आहे. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओला संपूर्ण रिव्हिंग टच दिलेला आहे. ही कार अनेक घटकांसह एक सिग्नेचर आयकॉनिक मॉडेल आहे. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ देखील एक फ्युचर मार्केटमध्ये, अपडेटेड व्हर्जनसह येण्याची अपेक्षा आहे.    


कारचे सीटसुद्धा अगदी कम्फर्टेबल आहेत. लांबच्या प्रवासाला सहज घेऊन जाणारी आणि तुमचा प्रवास सुखकर करणारी ही कार लवकरच बाजारात येणार आहे.  DSL लेटरिंग सूचित करते की डिझेल इंजिन असेल आणि 130 MT डिलिव्हरी दर्शवते की इंजिन 130 Bhp पीक पॉवर जनरेट करेल आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये जोडले जाईल. या प्रकरणात, 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन SUV साठी उर्जा जनरेट करेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI