मुंबई : जागतिक पर्यटन दिनाचा (Tourism Day) आनंद लुटण्यासाठी अनेक जण राइडिंगचा पर्याय निवडतात. नयनरम्य पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी स्वत:च्या गाडीने प्रवास करण्याला बरेच जण पसंती देतात. पण डोंगरदऱ्यांमध्ये,  समुद्रकिनारी, वाळवंटामध्‍ये किंवा ऐतिहासिक ठिकाणी प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे योग्य कार असणं देखील तितकचं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यास मदत होऊ शकते. पण कार (Car) खरेदी करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो बजेटचा. बजेटमुळे अनेकजण कार खरेदी करताना पाऊल मागे घेतात. 


पण अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्ही कार घेण्याचा विचार नक्की करु शकता. दहा लाखांच्या आतमध्ये तुम्हाला आत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशा काही कार विकत घेता येऊ शकतील. यामध्ये अद्यायावत यंत्रणा, आकर्षक डिझाईन, रंग या सगळ्याचा समावेश करण्यात आला आहे. रेनॉ ट्रायबर, महिंद्रा एक्‍सयूव्‍ही 300, ह्युंदाई व्‍हेन्‍यू,  रेनॉ कायगर आणि  मारूती सुझुकी ब्रेझा या कार दहा लाखांच्या आतमध्ये तुम्हाला विकत घेता येऊ शकतील. याच कारविषयी सविस्तर जाणून घेऊया. 


1. रेनॉ ट्रायबर - किंमत 6.33 लाख रुपये


'रेनॉ ट्रायबर' ही भारतातील एक नामवंत अशी कार आहे. सेवन सिटर या कारचा दर्जा देखील तितकाच उल्लेखनीय आहे. या कारचे मॉड्युलेरिटी आणि आकर्षक डिझाइनसाठी अनेकजन या कारचे भरभरुन कौतुक करण्यात आले आहे. याच्या किंमतीनुसार अनेक उच्च दर्जाची वैशिष्ट्ये समावशिष्ट आहेत. यामध्ये अगदी  एैसपैस सिटींग अरेंजमेंट असल्यामुळे सर्व प्रवाशांना अगदी आरामदायी प्रवास करता येऊ शकतो. तर याची बूट स्पेस 625 लिटर्ससह समाविष्ट करण्यात आलीये. त्यामुळे भरपूर सामान ठेवण्यास मदत होऊ शकते. या कारच्या या श्रेणीमध्ये  क्रोम फिनिश एक्‍स्‍टीरिअर डोअर हँडल्‍स आणि नवीन सीट अपहोल्‍स्‍टरी देखील समाविष्ट करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी या कारला ग्‍लोबल एनसीएपीकडून चार स्टारचे रेंटिंग मिळाले आहे. 


2. महिंद्रा एक्‍सयूव्‍ही 300 - किंमत 7.99 लाख रुपये  


महिंद्राने नुकतेच एक्‍सयूव्‍ही 300 चे नवीन व्‍हेरिएण्‍ट लाँच केले आहे. यामध्ये 1.2 लीटर एमस्टेलियन टीजीडीआय पेट्रोल इंजिन आहे. ज्यामुळे त्याच्या  टर्बोचार्ज्‍ड या पर्यांयाचा देखील विस्तार करण्यात आला आहे. एक्‍सयूव्‍ही 300 मध्ये विविध वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये  ड्युअल-झोन क्‍लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलॅम्‍प्‍स आणि वायपर्स,  स्‍टीअरिंग मोड्स, रिअर पार्किंग कॅमेरा, फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर्स आणि सनरूफ यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. तसेच  एैसपैस जागा आणि हवा खेळती राहिल असे केबिन आहे. यामुळे सर्व प्रवाशांना अगदी आरामदायी प्रवास करता येऊ शकतो. 


3. ह्युंदाई व्‍हेन्‍यू - किंमत 7.77 लाख रुपये 


ही ह्यूंदाई व्‍हेन्‍यू स्‍पोर्टी लुक असलेली कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही आहे. या कारमध्‍ये अँड्रॉईड ऑटो, अॅप्‍पल कारप्‍ले, रिक्‍लायनिंग रिअर सीट्स, ऑनबोर्ड वॉईस कमांड्स आणि स्‍मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ अशी उत्कृष्ट वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल व्‍हेरिएण्‍ट्ससह यामध्ये आयएमटी ट्रान्‍समिशन पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे . या कारमध्ये उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर याचे प्रिमिअम इंटीरिअर आणि डॅशबोर्ड देखील उत्तम दर्जाचे आहे. 


4. रेनॉ कायगर - किंमत 6.47 लाख रुपये


1.0  लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.0  लीटर एनर्जी पेट्रोल इंजिनचा सामावेश  रेनॉ कायगरमध्ये करण्यात आला आहे. यामुळे उत्कृष्ट आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव घेता येतो. या  रेनॉ कायगरमध्‍ये एक्‍स-ट्रॉनिक सीव्‍हीटी आणि 5 स्‍पीड ईजी-आर एएमटी ट्रान्‍समिशन आहे.  किफायतशीर मेन्‍टेनन्‍ससह कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागातील सर्वात परवडणारी ही कार आहे.  अधिक कार्यक्षमता आणि  स्‍पोर्टी ड्राइव्‍ह करण्याचा अनुभव कायगरमुळे मिळतो. तसेच या कारमध्ये 20.62 किमी/लीटरची बेस्‍ट-इन-सेगमेंट इंधन कार्यक्षमता आहे. तर सुरक्षेसाठी  रेनॉ कायगरला ग्‍लोबल एनसीएपीने चार स्टार दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेनॉ कायगरमध्‍ये चार एअरबॅग्‍ज, प्री-टेन्‍शनरसह सीटबेल्‍ट्स  आणि  ड्रायव्‍हरसाठी लोड-लिमिटर आहे.


5. मारूती सुझुकी ब्रेझा - किंमत 8.29 लाख रुपये


ब्रेझा मारुती ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये अव्वलस्थानी आहेत. या कारमध्‍ये अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. 7 इंच स्‍मार्ट प्‍ले स्‍टुडिओ टचस्क्रिनसह अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍लेसाठी सपोर्ट समावशिष्ट करण्यात आले आहे. ब्रेझामधील एैसपैस केबिन, अधिक स्‍टोरेज जागा आणि आरामदायी राइड यामुळे सर्वोत्कृषट रायडिंगचा अनुभव मिळण्यास मदत होते. 


हेही वाचा : 


Hydrogen Bus: भारताची पहिली हायड्रोजन बस होतेय सुरू; पेट्रोल-डिझेलची गरज नाही, फक्त हवा आणि पाण्यावर होणार काम


Car loan Information:

Calculate Car Loan EMI