Top 5 bikes launched in India in 2021 : यंदाच्या वर्षात म्हणजेच 2021 मध्ये भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, त्यावर मात करत यावर्षी काही उत्तम मोटारसायकल्स लाँच करण्यात आल्या. दरम्यान TVS Raider 125, Yamaha R15 V4 आणि Suzuki Hayabusa सारख्या अनेक उत्तम मोटरसायकल लॉन्च झाल्या आहेत.


2021 वर्षातल्या टॉप 5 मोटारसायकल


TVS Raider 125 - 
टीव्हीएसने TVS Raider 125 ही बाईक अलिकडेच लॉन्च केली. ही बाजारपेठेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण 125cc मोटरसायकल पैकी एक ठरली. या बाईकमध्ये 124.8cc, सिंगल-सिलेंडर, तीन-वाल्व्ह, एअर-आणि-ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 11.2 hp पॉवर आणि 11.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. TVS Raider 125 ची भारतात किंमत 77,500 ते रु 85,469 (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.


Bajaj Pulsar 250 - 
बजाज ऑटोने या वर्षी आपली सर्वात मोठी पल्सर मोटरसायकल लॉन्च केली. नवीन बजाज पल्सर 250 मध्ये 249.07cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे जे 24.1 hp पॉवर आणि 21.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याला असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील मिळतो. बजाज पल्सर 250 रेंजची सध्या भारतात किंमत 1.38 लाख ते 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.




Yamaha R15 V4 - 
यामाहाने अलीकडेच भारतात नवीन जनरेशन R15 लाँच केलं आणि ते नेहमीपेक्षा चांगले आहे. नवीन Yamaha R15 V4 हे YZF-R7 मध्यम वजनाच्या सुपर स्पोर्टच्या डिझाईन सारखी आहे आणि त्यात अनेक सेगमेंटमध्ये फर्स्ट फीचर्स मिळतात. मोटारसायकलला उर्जा देणारे 155cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, VVA तंत्रज्ञानासह इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. ही मोटर १८.४ एचपी पॉवर आणि १४.२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या मोटरसायकलची किंमत सध्या 1.70 लाख ते 1.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.



Royal Enfield Classic 350 - 
रॉयल एनफील्डने यावर्षी भारतात न्यू जनरेशन Classic 350 लाँच केली. सेकंड जनरेशन क्लासिक 350 ही नवीन J-सिरीज 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर- आणि ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिनद्वारे तयार आहे जी 20 hp पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन Royal Enfield Classic 350 ची भारतात सध्या किंमत रु. 1.84 लाख ते रु. 2.15 लाख (एक्स-शोरूम) आहे.




New-Gen Suzuki Hayabusa - 
या यादीत असलेली शेवटची मोटरसायकल सुझुकी हायाबुसा... थर्ड जनरेशन मधील सुझुकी हायाबुसाने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक स्तरावर लॉन्चिंग केले आणि काही वेळात भारतीय बाजारपेठेत पोहोचली. ही 1340cc, इनलाइन-फोर-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे तयार आहे जी 187 hp आणि 150 Nm पीक टॉर्क देते. ही 6-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स शी जोडलेली आहे. नवीन Suzuki Hayabusa ची सध्या भारतात किंमत 16.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI