Mahindra XUV300 Price: जर तुम्हाला बजेट रेंजमध्ये चांगली SUV खरेदी करायची असेल, तर महिंद्राची XUV300 तुमच्यासाठी खूप चांगला आणि पॉवरफुल पर्याय ठरू शकतो. यात तुम्हाला दमदार फीचर्स पहिला मिळतील. चला तर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.


Mahindra XUV300 चा सर्वात स्वस्त व्हेरिएंट


जर आपण XUV300 चा सर्वात परवडणारा व्हेरिएंट पाहिला तर तो त्याचा बेस व्हेरिएंट W4 आहे. या बेस मॉडेलमध्ये काही फीचर्स कमी असतील, पण बेसिक फीचर्स, लूक आणि पॉवर या बाबतीत ही कार एकदम जबरदस्त आहे. याची किंमत 8,41,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे. असं असलं तरी याच्या ऑन-रोड किंमत वाढ होऊ शकते. परंतु तरीही एक परवडणारी कार आहे. तुमच्या बजेट रेंजसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्हाला XUV300 हप्त्यांवर खरेदी करायची असेल. तर या कारची EMI 13,646.27/महिना पासून सुरू होते. हे मॉडेल पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.


इंजिन आणि पॉवर 


XUV 300 सब-कॉम्पॅक्ट SUV 1197cc पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 5000 rpm वर 108.59 hp ची पॉवर आणि 2000-3500 rpm वर 200 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते.


फीचर्स 


फीचर्सच्या बाबतीत XUV 300 मध्ये टच लेन चेंज इंडिकेटर, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड HVAC, स्टोरेजसह पॅडेड फ्रंट आर्मरेस्ट, ऑल 4 पॉवर विंडो सेटअपसह स्मार्ट स्टीयरिंग सिस्टम, ऑल 4 डिस्क ब्रेक, बॉटल होल्डर (ऑल डोअर), एक्स्टेंडेड पॉवर विंडो यांचा समावेश आहे. यात यूएसबी चार्जिंग पॉइंट्स, 17.78 सेमी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, सेंटर रूफ लॅम्प, मोनोक्रोम इन्फोटेनमेंट डिस्प्ले, सेंट्रल लॉकिंग, मायक्रो हायब्रीड तंत्रज्ञान, फ्रंट आणि रिअर पॉवर विंडोज, उंची अॅडजस्टेबल फ्रंट सीट बेल्ट्स, ब्लूसेन्स अॅप, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीझ, 4 स्पीकर पोझिशन डिस्प्ले, 12V ऍक्सेसरी सॉकेट आणि स्मार्ट स्टीयरिंग सिस्टीम यासारखी फीचर्स देण्यात आले आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI