Safe Cars of India: कोरोनानंतर पुन्हा एकदा भारतीय वाहन क्षेत्राला चालना मिळताना दिसत आहे. गाड्यांच्या विक्रीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अशातच अनेक जण कार खरेदी करता फक्त त्याचा लूक पाहतात. मात्र असं केल्यास तुम्हाला ही चूक महागात पडू शकते. कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्स खूप महत्वाचे असतात. कारण कोणत्याही अपघाताच्या वेळी ते तुमचे प्राण वाचवण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही नवीन कार खरेदी करणार असाल तर सर्वात आधी कारची सेफ्टी फीचर्स आणि क्रॅश टेस्ट रेटिंग नक्की तपास. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या अतिशय सुरक्षित मानल्या जातात.


टाटा पंच (tata punch)


प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटोर्सची ही मिनी एसयूव्ही बाजारात अगदी परवडणाऱ्या किमतीत येते. पण सुरक्षिततेच्या बाबतीत ती खूप पुढे आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला GNCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. म्हणूनच ही एक अतिशय सुरक्षित कार आहे.


टाटा नेक्सन (tata nexon) 


सेफ्टी फीचर्समुळे या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बाजारात सर्वाधिक विक्री झाली आहे. ही एक सुरक्षित फॅमिली कार आहे. ज्यामध्ये भरपूर सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. ही सेफ्टी फीचर्सअपघात झाल्यास तुमचे प्राण वाचवू शकतात. या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.


महिंद्रा XUV 300


महिंद्राची ही एसयूव्ही कार देशात खूप विकली जाते. ज्याचे एक कारण म्हणजे ती अतिशय सुरक्षित आहे. या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग देखील मिळाली आहे. तसेच ही कार अतिशय स्टायलिश आहे आणि अनेक सेफ्टी फीचर्ससह येते.


टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz)


टाटाची ही प्रीमियम हॅचबॅक कार अतिशय सुरक्षित मानली जाते. या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. याचा अर्थ या कारमध्ये तुमचा जीव सुरक्षित असण्याची शक्यता खूप जास्त आहे. ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.


मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Vitara Brezza SUV)


मारुती सुझुकीची Vitara Brezza SUV ही देखील अतिशय सुरक्षित कार आहे. या कारला ग्लोबल NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. मात्र आता या कारचे नवीन व्हर्जन ब्रेझा देशात आले आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI