Honda Elevate vs Hyundai Creta vs Kia Seltos vs Maruti Grand Vitara : Honda ने अलीकडेच नवीन मध्यम आकाराच्या SUV Elevate च्या किमती जाहीर केल्या आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते, जी त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंटसाठी 16 लाखांपर्यंत जाते. नवीन Honda Elevate SUV बाजारात Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, Maruti Grand Vitara, Toyota Hyrider आणि MG Astor यांच्याशी स्पर्धा करणार आहे. एलिव्हेट फक्त नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. तर इतर सर्व प्रतिस्पर्धी टर्बो पेट्रोल, डिझेल आणि मजबूत हायब्रिडसह अनेक इंजिन पर्याय देतात. तर आज आपण Elevate, Creta, Seltos आणि Grand Vitara च्या पेट्रोल इंजिनच्या किमतींची तुलना करून सांगणार आहोत.
इंजिन कसे असेल?
Honda Elevate ला 1.5-liter 4-सिलेंडर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे सिटी सेडानमध्ये देखील वापरले जाते. हे इंजिन 121 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
सेल्टोस आणि क्रेटाला 1.5-लिटर इंजिन मिळते, जे 115 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशन समाविष्ट आहे.
ग्रँड विटारा 1.5-लिटर नैसर्गिकरित्या-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते, जे 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत माईल्ड हायब्रीड सिस्टीम उपलब्ध आहे. त्यामुळे जास्त मायलेज मिळते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.
किंमत किती असेल?
- एलिव्हेट एसयूव्ही 4 ट्रिम स्तरांमध्ये ऑफर केली जाते - SV, V, VX आणि ZX. बेस SV ट्रिम वगळता, सर्व तीन ट्रिम्स मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स पर्याय आहेत.
- Honda Elevate च्या मॅन्युअल आवृत्तीची किंमत 11 लाख ते 14.90 लाख रुपये आहे, तर CVT आवृत्तीची किंमत V CVT साठी 13.21 लाख रुपये आणि टॉप-स्पेक ऑटोमॅटिक पर्यायासाठी 16 लाख रुपये आहे.
- Hyundai Creta च्या मॅन्युअल व्हर्जनची किंमत 10.87 लाख ते 15.17 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 16.33 लाख ते 17.89 लाख रुपये आहे.
- तर, बेस पेट्रोल मॅन्युअलसाठी सेल्टोसची किंमत 10.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-एंड पेट्रोल मॅन्युअलसाठी 15.20 लाखांपर्यंत जाते. तर त्याच्या ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 16.20 लाख रुपये आहे.
- मारुती ग्रँड विटाराच्या लाईट-हायब्रीड व्हर्जनची मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी किंमत 10.70 लाख रूपये ते 17.07 लाख रूपयां दरम्यान आहे, तर ऑटोमॅटिक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 13.60 लाख रूपयांपासून ते 17.07 लाखां दरम्यान आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Bikes Sales September 2023 : सुझुकी मोटरसायकलने देशांतर्गत केली सर्वाधिक विक्री, वाचा सविस्तर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI