Best CNG Cars Under 10 Lakh : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या (Best CNG Cars ) किमतींनंतर बाजारात सीएनजी कारची क्रेझ वाढली आहे. या कारला नेहमीच्या गाड्यांपेक्षा जास्त मायलेज मिळतं. त्यामुळे अनेक लोक आता हायब्रिड गाड्या खरेदी करण्यावर भर देत आहे नाही तर थेट CNG गाड्या घेण्यावर भर देताना दिसत आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच 5 आलिशान सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा CNG
मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीमध्ये 1462 CCचे इंजिन देण्यात आले आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1462 सीसीइंजिन 5500 आरपीएमवर 86.62 बीएचपी पॉवर आणि 4200 आरपीएमवर 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 25.51 किमी प्रति किलो मायलेज मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत याची एक्स शोरूम किंमत 10.60 लाख रुपये आहे.
मारुती फ्रॉन्क्स सिग्मा CNG
मारुती फ्रॉन्क्स सिग्मा सीएनजीमध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले असून ते 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1197 सीसीइंजिन 6000 आरपीएमवर 76.43 बीएचपी पॉवर आणि 4300 आरपीएमवर 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 28.51 किमी प्रति किलोचे सर्टिफाइड मायलेजसह येते. या कारची एक्स शोरूम किंमत 8.41 लाख रुपये आहे.
ह्युंडाई ऑरा एस CNG
ह्युंदाई ऑरा एस सीएनजीमध्ये 1197 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1197 सीसी इंजिन 6000 आरपीएमवर 67.72 बीएचपी पॉवर आणि सीएनजीसह 4000 आरपीएमवर 95.2 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर ही कार 22.0 किमी/किलोचे मायलेज देते. या कारची शोरूम किंमत 8.23 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी डिझायर CNG
मारुती सुझुकी डिझायर व्हीएक्सआय सीएनजीमध्ये 1197 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 1197 सीसीइंजिन 6000 आरपीएमवर 76.43 बीएचपी पॉवर आणि 4300 आरपीएमवर 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज 31.12 किमी/किलोमीटर आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.39 लाख रुपये आहे.
टाटा टियागो एक्सजेड प्लस CNG
टाटा टियागो एक्सझेड प्लस सीएनजीमध्ये 1199 सीसी इंजिन आहे जे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 6000 आरपीएमवर 74 बीएचपी पॉवर आणि 3500 आरपीएमवर 95 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 26.49 किमी प्रति किलोमीटर मायलेज देते. या कारची शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे.
इतर महत्वाची बातमी-
Car loan Information:
Calculate Car Loan EMI