Tata Tiago Electric Car: देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर लॉन्च करत आहे. मात्र नियमित वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत अधिक असल्याची तक्रार अनेक ग्राहक करतात. अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स लवकरच एक स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, अशी चर्चा आहे.  


टाटा मोटर्स आपल्या Tiago कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात उतरवणार आहे. जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त ही माहिती दिली कंपनीने दिली आहे. कंपनी येत्या आठवड्यात Tiago EV ची किंमत आणि इतर महत्त्वाचे तपशील जारी करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV ची किंमत 12.5 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. असे सांगण्यात येत आहे की Tiago EV पूर्ण चार्ज केल्यावर 250 किमीची रेंज देईल.


टाटा मोटर्सने पुढील 5 वर्षांत 10 इलेक्ट्रिक वाहन मॉडेल सादर करण्याचे लक्षठेवले आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे (Tata Motors Passenger Vehicles-TMPV)   व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही Tiago EV सह आमच्या EV विभागाच्या विस्ताराची घोषणा करतो. 


कंपनीने एका म्हटले आहे की, आम्हाला भारताला जगातील इलेक्ट्रिक वाहन केंद्र बनवायचे आहे. कंपनीने सांगितले की, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने (TPEM) TPG Rise Climate च्या सहकार्याने एक नवीन मोबिलिटी सोल्यूशन सादर केले आहे. ग्रीन राईडला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे. यासोबतच 2030 पर्यंत देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या 30 टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने असावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.


TMPV चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, Tata Motors भारतातील EV मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ईव्ही मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा 88 टक्के हिस्सा आहे. कंपनीने या बाजारात नेक्सन ईव्ही आणि टिगोर ईव्हीसह पदार्पण केले. सध्या देशातील रस्त्यांवर 40,000 हून अधिक टाटा ईव्ही धावत आहेत. तर देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री बाबत टाटा मोटर्स आघाडीवर आहे. कंपनीची इलेक्ट्रिक कार नेक्सन सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI