ज्या गाडीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती टाटा सिएरा (Tata Sierra) अखेर लाँच झाली आहे! १६ डिसेंबर २०२५ पासून या SUV चे बुकिंगही सुरू झाले आहे. जर तुम्ही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. "सर्वात आधी बोलूया किमतीबद्दल. टाटा सिएराच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेल १८.४९ लाख रुपयांपर्यंत जाते.
डाउन पेमेंट किती लागेल?
जर तुम्ही बेस मॉडेल फायनान्स केले, तर तुम्हाला किमान २ लाख रुपये डाउन पेमेंट द्यावे लागेल. यानंतर उरलेल्या रकमेवर ९% व्याजाने ५ वर्षांसाठी तुमचा हप्ता (EMI) साधारण २३,७५१ रुपये इतका येईल.
मायलेज किती?
परफॉर्मन्सबद्दल सांगायचे तर, यात पेट्रोल इंजिन आहे जे १०५ bhp पॉवर देते. गाडीचे मायलेज सुद्धा जबरदस्त आहे – तब्बल १८.२ च मायलेज मिळतो! शिवाय यामध्ये टर्बो-पेट्रोल आणि टर्बो-डीझेल इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.
या गाड्यांसोबत तगडी टक्कर
भारतीय मार्केटमध्ये ही गाडी Hyundai Creta, Kia आणि Renault Duster सारख्या मोठ्या गाड्यांना तगडी टक्कर देणार आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI