Next Gen Hector Unveil: एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज (9 जानेवारी) नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे (Next-Gen Hector) अनावरण केलं. या कारमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान, आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्यांचा समावेश आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची निर्मिती ही अधिक सर्वोत्तम सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. या नव्या एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर आणि लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत. 5, 6 आणि 7-आसनी कन्फिग्युरेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाईन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि ऐसपैस जागा आहे.


नेक्स्ट-जनरेशन हेक्टर लुक्स, इंटीरिअर्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत एमजी हेक्टरचा दर्जा वाढवते : राजीव छाबा


एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, "आम्ही 2019 मध्ये लाँच केल्यापासून एमजी हेक्टरला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आमच्या ग्राहकांचे आभार मानतो. हेक्टरने पहिल्यांदाच इंटरनेट कारचा अनुभव दिला. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर लुक्स, इंटीरिअर्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत एमजी हेक्टरचा दर्जा वाढवते. ही कार आमच्या एमजी शील्ड प्रोग्रामच्या आश्वासनासह येते, जे आमच्या ग्राहकांना विनासायास आणि सुलभ मालकीहक्क अनुभव देते. ग्राहक आता भारतभरातील आमच्या 300 केंद्रांमध्ये स्वत:हून नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा अनुभव घेऊ शकतात."


नेक्स्ट-जनरेशन हेक्टरची वैशिष्ट्ये


ऑटोनॉमस लेव्हल 2 एसयूव्हीमध्ये 11 अॅडवान्स्ड ड्रायव्हर असि‍स्टण्स सिस्टम्स (एडीएएस) वैशिष्ट्यांसह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) आणि ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता आणि आरामदायीपणाची खात्री मिळते. इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व्हेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या व्हेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न आणि अधिक सुरक्षिततेची खात्री देते.


नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेअर्स देखील त्रासमुक्त आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडिकेटर लाईट आपोआप ऑन किंवा ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडिकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.


नवीन एसयूव्हीमध्ये भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टमसह ब्रॅण्ड-न्यू युजर इंटरफेस आहे. यात तंत्रज्ञान इनोव्हेटिव फर्स्ट-इन-सेगमेंट डिजिटल ब्ल्यूटूथ की आणि की शेअरिंग क्षमतेमध्ये समाविष्ट आहे. इमर्जन्सीमध्ये किंवा चावी हरवल्यास डिजिटल की व्हेईकल लॉक, अनलॉक, स्टार्ट आणि ड्राईव्ह करण्यासाठी वापरता येऊ शकते. रिमोट लॉक/अनलॉक वैशिष्ट्याचा वापर करत कार कुठूनही अनलॉक करता येऊ शकते. की-शेअरिंग फंक्शनसह जवळपास दोन व्यक्तींना अतिरिक्त की शेअर करता येऊ शकते.


तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये 75 हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह 100 वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय क्रांतिकारी आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर आणि आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टिव्हीटी, सर्विसेस आणि अॅप्लिकेशन्स आहेत.


नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे 6 एअरबॅग्स, 360-डिग्री, एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी 3-पॉईंट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी)आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स.


5, 6 आणि 7-आसनी कन्फिग्युरेशन्समध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टर प्लसमध्ये इंटेलिजण्टली डिझाईन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स व ऐसपैस जागा आहे. इंटीरिअर्स ड्युअल-टोन अर्जाइल ब्राऊन आणि ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. 6-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर 7-आसनी व्हेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.


नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अद्वितीय कार मालकीहक्क प्रोग्राम 'एमजी शील्ड' विक्री-पश्चात्त सेवा पर्यायांचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना प्रमाणित 5+5+5 पॅकेज देण्यात येईल, म्हणजेच मर्यादित किलोमीटर्ससह पाच वर्षांची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाईड असिस्टण्स आणि पाच लेबर-फ्री पीरियोडिक सर्विसेस.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI