Suzuki Access 125 launched in new colour: भारतात 125 सीसी सेगमेंटमध्ये अनेक स्कूटर उपलब्ध आहे. मात्र या सेगमेंटमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात सुझुकीची स्कूटर खरेदी करण्यास पसंती देतात. ही स्कूटर दुचाकीस्वाराला स्पोर्टी बाईकचा फील देते. अशातच कंपनीने आपल्या लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर Suzuki Access 125 नवीन रंगात भारतात लॉन्च केली आहे. देशात सणासुदीचा हंगाम सुरू असताना कंपनीने आपली ही स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर आता 'सॉलिड आइस ग्रीन किंवा पर्ल मिराज व्हाइट' रंगात उपलब्ध आहे. या स्कूटरची प्रारंभिक किंमत 83,000 रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे. स्कूटरच्या ड्रम आणि डिस्क ब्रेक या दोन्ही प्रकारांमध्ये नवीन ड्युअल-टोन कलर स्कीम उपलब्ध आहे.


कंपनीने Access 125 स्कूटर सॉलिड आइस ग्रीन किंवा पर्ल मिराज व्हाईटमध्ये नवीन रंगांमध्ये सादर केली जाईल. या स्कूटरला हेडलाइट, अॅप्रॉन, फ्रंट फेंडर आणि साइड पॅनेलला हलका-हिरवा रंग देण्यात आले आहे. तर इतर फ्रंट पॅनेलला पांढरा रंग देण्यात आला आहे. तसेच स्कूटरची सीट गडद तपकिरी रंगाची आहे. दरम्यान, Access 125 स्कूटरमध्ये आधीच पर्ल सुझुकी डीप ब्लू, मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्व्हर, पर्ल मिराज व्हाइट, ग्लास स्पार्कल ब्लॅक, ग्लॉसी ग्रे कलर आणि मेटॅलिक मॅट फायब्रोयन ग्रे असे रंग पर्याय उपलब्ध आहेत.


इंजिन आणि पॉवर 


कंपनीने या स्कूटरमध्ये 125 मध्ये 124 cc, 4-स्ट्रोक, 1-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 6,750 rpm वर 8.5 bhp आणि 10 Nm पॉवर जनरेट करते. तसेच हे सीव्हीटी युनिटशी संलग्न आहे. इंजिनला पॉवर डिलिव्हरीसोबत मायलेज वाढवण्यासाठी सुझुकी इको परफॉर्मन्स टेक्नॉलॉजी (SEPT) देखील देण्यात आली आहे.


Suzuki Access 125 मध्ये इंधनसाठी बाहेरच रिफिलिंग झाकण देण्यात आले आहे. तसेच यात LED लाईट आणि USB सॉकेट यांचा समावेश आहे. सुझुकी अॅक्सेस सेफ्टीच्या बाबतीत, तुम्हाला सरकारी निर्देशानुसार साइड स्टँड इंटरलॉकची सुविधा मिळते. या फीचरचा फायदा असा आहे की, जोपर्यंत स्कूटरचे साइड स्टँड तुम्ही वर करत नाही तोपर्यंत याचे इंजिन सुरू होत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च! दिसायला देखणी आणि दमदार, 4.63 कोटींच्या या कारमध्ये जाणून घ्या काय आहे खास


Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI