Tata Nexon New Model: कार निर्माता कंपनी Tata Motors ने भारतात आपल्या लोकप्रिय SUV Nexon चा सब-4 मीटर XM+(S) व्हेरिएंट लॉन्च केला आहे. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 9.75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवीन व्हेरिएंट XM(S) आणि XZ+ च्या मध्ये ठेवण्यात आला आहे. Tata Nexon XM+(S) व्हेरिएंट एकूण चार ट्रिममध्ये उपलब्ध असेल. Tata Nexon च्या या नवीन व्हेरिएंटमध्ये कोणते विशेष फीचर्स देण्यात आले आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. 

Tata Nexon XM+(S) व्हेरिएंटच्या वेगवेगळ्या मॉडेलची किंमती

Models

Start Price ( in INR, Ex-showroom Delhi)

XM+(S) (Petrol. Manual)

9.75 Lakhs

XMA+(S) (Petrol, Automatic)

10.40 Lakhs

XM+ (S) (Diesel, Manual)

11.05 Lakhs

XMA+ (S) (Diesel, Automatic)

11.70 Lakhs

कलर पर्याय आणि फीचर्स 

नवीन Tata Nexon XM+(S) व्हेरिएंट कॅलगरी व्हाईट, डेटोना ग्रे, फ्लेम रेड आणि फॉलीएज ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात इलेक्ट्रिक सनरूफ, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर सिस्टम, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर एसी व्हेंट्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-ड्राइव्ह मोड, 12V रियर पॉवर सॉकेट आणि शार्क फिन अँटेना उपलब्ध असेल.

इंजिन 

या नवीन कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे स्वयंचलित (AMT) किंवा मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जातील. नवीन Nexon XM+(S) व्हेरिएंटसह Tata आता Nexon SUV एकूण 62 प्रकारांमध्ये ऑफर करते. ज्यात 33 पेट्रोल आणि 29 डिझेल ट्रिम आहेत.

विद्यमान ग्राहकांना मिळणार मोफत सॉफ्टवेअर अपडेट

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे उपाध्यक्ष राजन अंबा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “देशातील नेक्सॉनच्या विक्रीत झालेली वाढ ही तिच्या लोकप्रियतेचा परिणाम आहे. नवीन फीचर्सने भरपूर XM+(S) व्हेरिएंट सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आमच्या नेक्सॉन पोर्टफोलिओमध्ये नक्कीच विविधता येईल आणि नवीन ग्राहकांना आमच्या शोरूमकडे आकर्षित करेल.” दरम्यान, कंपनीने घोषणा केली आहे की, ते नेक्सॉनच्या विद्यमान ग्राहकांना पहिले सॉफ्टवेअर अपडेट मोफत देणार आहे. ग्राहक 25 जुलै 2022 पासून टाटा मोटर्सच्या अधिकृत सेवा केंद्रांवर सॉफ्टवेअर अपडेट करू शकतात. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI