Solar Electric Car: भारतात इलेक्ट्रिक कारच्या कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र जशी मागणी वाढली आहे. तशाच इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी पायाभूत सुविधा अद्याप वाढल्या नाही. म्हणून अनेकवेळा इलेक्ट्रिक वाहन मालकांना रस्त्यात असताना चार्जिंग संपल्यास अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र यालाच पर्याय म्हणून जर्मनीची वाहन उत्पादक कंपनी सोनो मोटर्सने सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारची बॉडी सोलर पॅनल्सने सुसज्ज आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
या सोलर ईव्हीमध्ये याच्या बॉडीत 456 सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहे बसविल्या जातात. जे सूर्यप्रकाशाने चार्ज झाल्यावर दर आठवड्याला 245 किमी पर्यंतची रेंज देते. ही कार फास्ट चार्जिंग आणि स्लो चार्जिंगला देखील सपोर्ट करते. ही कार फास्ट चार्जरच्या मदतीने 35 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 80 टक्के चार्ज होऊ शकते. यातील 54 kWh बॅटरी पॅक एका चार्जवर एकूण 305 किमीची रेंज देते. ही कार दोन-दिशात्मक वॉलबॉक्स म्हणून काम करू शकते. म्हणजेच तुमच्या घरातील बॅटरीला जोडून तुम्ही पाच दिवस वीज वापरू शकता.
फीचर्स
या कारच्या आतील भागात डिजिटल इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि 10-इंचाचा टच डिस्प्ले आहे. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो इंटिग्रेशन, ब्लूटूथ हँड्स-फ्री कॉलिंग, क्लायमेट कंट्रोल आणि सोलर पॉवर, ऊर्जेचा वापर आणि चार्जिंग/डिस्चार्जिंग कंट्रोल्सची माहिती देणारी अॅप्स सारखे फीचर्स यात ग्राहकांना मिळणार. सायन सोलर ईव्ही 2023 पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध होईल. याची किंमत सुमारे USD 25,000 ( भारतीय चलनात 20.59 लाख रुपये) असेल. सर्वात आधी ही कार जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमधील ग्राहकांना विकली जाणार आहे. भारतात ही कार कधी लॉन्च होणार याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आत्तापर्यंत या कारला सुमारे 2,000 डॉलर्सच्या सरासरी डाउन पेमेंटसह 20,000 हून अधिक बुकिंग प्राप्त झाले आहेत. Sono ने ऑपरेटर्सकडून 22,000 पेक्षा जास्त प्री-ऑर्डर मिळवल्या आहेत. कार सबस्क्रिप्शन सर्व्हिस फिनकडून 12,000 ऑर्डर्स मिळवल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेतील स्टार्ट-अप कंपनी Aptera EV ने देखील आपली सोलर कार सादर केली आहे. ही एक हायब्रीड कार आहे. जी बॅटरी आणि सोलर चार्जिंग या दोन्हीवर धावू शकते.
महत्वाच्या बातम्या :
'या' सोलर कारसमोर इलेक्ट्रिक कारही आहे फेल, एका चार्जमध्ये गाठते 1,600 किमी
Car loan Information:
Calculate Car Loan EMI