Ola Electric Big Announcement On 22nd October: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाने आपला ठसा उमटवला आहे. अशातच कंपनी आता दिवाळीत मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. असे ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिले आहेत. भाविश आपल्या ट्विटमध्ये दर दुसर्या दिवशी सतत सांगणात आहेत की, ते 22 ऑक्टोबरला काहीतरी मोठा धमाका करणार आहे. इतका मोठा की, इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये कदाचित असं झालं नसेल.
भाविश अग्रवाल ट्वीट करून म्हणाले आहेत की, '22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आमच्या दिवाळी कार्यक्रमात ओलाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली जाईल. लवकरच भेटू' ओलाचा हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.
हा कार्यक्रम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दिवशी कंपनी आपल्या नवीन स्कूटर Ola S1 चा नवीन प्रकार सादर करेल. हा प्रकार नवीन सॉफ्टवेअर अपडेटसह येईल. HT Auto ने दिलेल्या बातमीनुसार, Ola ची ही स्कूटर आतापर्यंतची सर्वात स्वस्त स्कूटर असेल, जी तुम्हाला एका चार्जवर 100 किलोमीटरची रेंज देईल. याची किंमत 70 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते, कारण ओला इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये विकल्या जाणार्या स्कूटर तसेच पेट्रोल सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल. ज्यांच्या किमती सध्या कमी आहेत. एवढेच नाही तर या स्कूटरमध्ये तुम्हाला अपडेटेड सॉफ्टवेअर MoveOS 2 देखील मिळेल.
सध्या Ola च्या दोन स्कूटर Ola S1, Ola s1 Pro सध्या बाजारात विकल्या जात आहेत. Ola s1 ची किमती 1 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीला आता या किमती कमी करून त्या ग्राहकांना आकर्षित करायचे आहे. एका रिपोर्टनुसार, Ola s1 ची जी नवीन अपग्रेडेड स्कूटर येईल, त्याचे नाव देखील खास असेल आणि किंमती कमी असतील.
सध्या ओलाच्या Ola S1 स्कूटरवर 10 हजार रुपयांची सूट दिली जात आहे, जी ग्राहकांना दिवाळीपर्यंत मिळेल. तुम्ही ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांमध्ये 5 वर्षांची विस्तारित वॉरंटी मिळेल. ओलाच्या सीईओने 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता नवीन ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की 'आम्ही तुमच्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता जे घेऊन येत आहोत, त्याची प्रतीक्षा करणे कठीण आहे'.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI